(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Global Leader Approval Ratings : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सर्वात लोकप्रिय नेते
Global Leader Approval Ratings : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. इतर देशांच्या पंतप्रधानांच्या तुलनेत मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
Global Leader Approval Ratings : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. इतर देशांच्या पंतप्रधानांच्या तुलनेत मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना 70 टक्के रेटिंग मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह इतर देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. मॉर्निंग कन्सल्टने (Morning Consult) 2019 पासून डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून मोदींची रेटिंग 60 टक्केंपेक्षा कमी झालेली नाही. आताही जगभरातील वयोवृद्धांमध्ये मोदींची क्रेज असल्याचं मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणातन समोर आलं आहे.
मॅक्सिनचं राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर 66 टक्के रेटिंगसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी 58 टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत. जर्मनीच्या एंजेला मर्केल 54 टक्केंसह चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन 47 टक्के रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 44 टक्केंसह सहाव्या स्थानावर आहेत. तर कॅनडाचे जस्टिन ट्रूडो 43 टक्केंसह सातव्या क्रमांकावर आहेत.
नेत्यांना मिळालेलं रेटिंग -
नरेंद्र मोदी- 70 टक्के
लोपेज ओब्राडोर- 66 टक्के
मारियो ड्रैगी- 58 टक्के
एंजेला मर्केल- 54 टक्के
स्कॉट मॉरिसन- 47 टक्के
जस्टिन ट्रूडो- 45 टक्के
जो बिडेन- 44 टक्के
फुमियो किशिदा- 42 टक्के
मून जे-इन- 41 टक्के
बोरिस जॉनसन- 40 टक्के
पेड्रो सांचेज़- 37 टक्के
इमैनुएल मैक्रों- 36 टक्के
जायर बोल्सोनारो- 35 टक्के
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxodoxB
— Morning Consult (@MorningConsult) November 6, 2021
Modi: 70%
López Obrador: 66%
Draghi: 58%
Merkel: 54%
Morrison: 47%
Biden: 44%
Trudeau: 43%
Kishida: 42%
Moon: 41%
Johnson: 40%
Sánchez: 37%
Macron: 36%
Bolsonaro: 35%
*Updated 11/4/21 pic.twitter.com/zqOTc7m1xQ
मॉर्निंग कन्सल्ट काय आहे?
मॉर्निंग कन्सल्ट अमेरिकास्थित राजकीय डेटा इंटेलिजन्स कंपनी आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील या 13 राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा केली जाते. तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेतलं जातं. तसेच निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटाही ही कंपनी प्रदान करते.