एक्स्प्लोर
भोपाळमध्ये शहीद जवानांच्या शौर्य स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
भोपाळ : शहीद जवानांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या भोपाळमधील शौर्य स्मारकाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधण्यात आलं आहे. या कार्यक्रमानंतर भोपाळमध्ये मोदींची सभाही होणार आहे.
भोपाळमध्ये 12 एकर जमिनीवर बांधण्यात आलेलं शौर्य स्मारक इतर स्मारकांपेक्षा वेगळं असेल. फाळणीच्या वेळी शहीद झालेल्या जवानांसोबतच चीन, बांगलादेशसोबतच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांचाही सन्मान या स्मारकातून करण्यात आला आहे.
जवानाच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेल्या शौर्य स्मारकासाठी 41 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या स्मारकात वीर जवानांची छायाचित्रं, युद्धांचा इतिहास याची सविस्तर माहिती विविध दालनांमध्ये मांडण्यात आला आहे. तसंच अमर जवान ज्योतीसाठी 60 फूटी स्तंभही उभारण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचं उद्धाटन होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement