एक्स्प्लोर

PM Modi Speech: पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी

Independence day speech on PM Modi: जेव्हा लाल किल्ल्यावरून स्वच्छ मिशनवर बोललं जातं, तेव्हा गावात स्वच्छतेविषयी चर्चा होते. मी समजतो की हे भारतातील चेतनेचे प्रतिक आहे. पंतप्रधान मोदी यांचं लाल किल्ल्यावरुन भाषण

नवी दिल्ली: भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या काळातील सरकारी योजनांचा आणि सुधारणांचा पाढा वाचला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच्या काळातील काँग्रेसशासित राजवटीच्या काळातील त्रुटींचा उल्लेख केला. अनेक दशकं भारत देश 'होता है, चलता है', अशा वृत्तीने चालत होता. नवीन काही करायला गेलं तर वाद होतील, अशी भीती अनेकांना वाटत होती. जितक्या गोष्टी आहेत, त्यामध्ये संतुष्ट राहा, अशी वृत्ती समाजात होती. देशात काही होणार नाही, परिस्थिती कधीच बदलणार नाही, अशी लोकांची मानसिकता होती. आमच्या सरकारने ही मानसिकता तोडण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. यापूर्वी पुढच्या पिढीसाठी आम्ही आतापासून काम का करायचे, अशा वृत्तीने राज्यकर्ते वागत होते. त्यावेळी तरुणांच्या अपेक्षांचा विचार झाला नाही. त्यामुळे तरुण हे संधी आणि सुधारणांच्या प्रतीक्षेत होते. आमच्या हातात सरकारची जबाबदारी आल्यावर आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. शहरी, मध्यमवर्ग, वंचित आणि तरुणांसाठी आमच्या सरकारने अनेक सुधारण केल्या. आम्ही या सुधारणा केवळ वाहवा मिळवण्यासाठी  किंवा राजकीय नाईलाजापोटी करत नाही तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले. 

आमच्यासाठी राष्ट्र प्रथम: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विकासाच्या मॉडेलचा उल्लेख केला. आमच्या सुधारणांचा मार्ग हा विकासाचा राजमार्ग आहे. या सुधारणा फक्त उच्चशिक्षीत किंवा बुद्धिवादी वर्गासाठी सीमित नाहीत. आम्ही राजकीय समीकरणांचा विचार करुन कोणत्याही सुधारणा राबवत नाही अथवा धोरणे ठरवत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हीच प्राथमिकता आहे. आमचा भारत महान व्हावा, हाच संकल्प मनात ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रात आज मोठा बदल, बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत

गेल्या दहा वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. पूर्वी आपल्या देशातील बँका संकटात होत्या.  बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले. जेव्हा बँक मजूबत असते तेव्हा अर्थव्यवस्थाही मजबूत होते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आणखी वाचा

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन काय-काय बोलले, जाणून घ्या सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
Embed widget