एक्स्प्लोर
रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधानांचा रात्री 10 वाजता कलेक्टरला फोन
![रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधानांचा रात्री 10 वाजता कलेक्टरला फोन Pm Modi Calls Dm For Road Construction रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधानांचा रात्री 10 वाजता कलेक्टरला फोन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28080238/modi-and-sandeep-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्लीः रस्त्याचं काम रखडल्यामुळे देशाचे पंतप्रधान थेट संबंधित कलेक्टरला फोन करतात, असं क्वचितच होतं. त्रिपुरातील नागरिकांना याचाच अनुभव आला. रखडलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी मोदींनी रात्री 10 वाजता कलेक्टरला फोन केला.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरु होती. या बैठकीत त्रिपुरातील एनएच 44 च्या कामाविषयी चर्चा चालू असताना थेट मोदींनीच त्याची दखल घेत कलेक्टर संदीप महात्मे यांना फोन करुन तातडीने काम करण्याचे आदेश दिले.
पावसामुळे खचलेला रस्ता
असा झाला संवाद
मोदीः माफ करा अवेळी फोन लावला.. आसाम आणि त्रिपुराला जोडणाऱ्या रस्त्याचं 10 किलोमीटरचं काम का रखडलं आहे, याची माहिती पाहिजे..
संदीप महात्मेः सर काम चालू आहे, पण मनुष्यबळ आणि इंफ्रास्ट्रक्चकरची कमी असल्यामुळं काम रखडलं आहे, लवकरच काम पूर्ण करु..
मोदीः तुम्ही काम लवकर पूर्ण करा, केंद्र आणि राज्याकडून पाहिजे ती मदत मिळेल..
खचलेला रस्ता
..म्हणून त्रिपुरात पेट्रोल 300 रुपये प्रति लीटर
एनएच 44 हा रस्ता त्रिपुराची लाईफलाईन मानला जातो. त्रिपुरासाठी इंधन, दैनंदिन गरजांच्या वस्तू याच रस्त्यावरुन येतात. मात्र पावसामुळे 15 किमीचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. याच कारणामुळे त्रिपुरात पेट्रोल 300 रुपये प्रति लीटर तर डिझेल 150 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे.
रस्ता बंद असल्यामुळे त्रिपुरातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नितीन गडकरी आणि मोदी यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मोदींनी उत्तर त्रिपुराच्या कलेक्टरला फोन लावून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मोदींनी आदेश दिल्यानंतर रस्त्याची स्थिती
मोदींनी आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर क्रांतीकारी बदल जाणवला. रस्त्याच्या कामासाठी 10 जेसीबी, 300 पेक्षा जास्त ट्रक आणि मोठं मनुष्यबळ कार्यरत आहे. संदीप महात्मे यांनी फेसबुक पेजवर याबाबतचे फोटोही शेअर केले आहेत. येत्या 6 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे.
![पावसामुळे खचलेला रस्ता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28075909/tripura-road-before-2-300x221.jpg)
![खचलेला रस्ता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28075947/tripura-road-before-300x171.jpg)
![tripura-road-after-2-300x225](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28080017/tripura-road-after-2-300x225.jpg)
![मोदींनी आदेश दिल्यानंतर रस्त्याची स्थिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28080017/tripura-road-after-2-300x225.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)