Petrol-Diesel Price : महागाईनं बेजार... पेट्रोल-डिझेलनंतर CNG मुळं खिशाला कात्री; गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे लागतील?
Petrol-Diesel Price Today 3rd August 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय?
Petrol-Diesel Price Today 3rd August 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे म्हणजेच, 3 ऑगस्ट 2022 चे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत गेल्या 70 दिवसांहून अधिक काळापासून पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांत (Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कापत केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
CNG महागलं, 86 रुपये प्रति किलो
आधीच वाढत्या महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे.
महानगर गॅस लिमिटेडनं जारी केलेल्या नव्या दरांनुसार, आता ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयांने खरेदी करावा लागेल. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. महानगर गॅस लिमिटेड ( MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोलच्या किमती | डिझेलच्या किमती |
मुंबई | 106.25 | 94.22 |
पुणे | 105 | 92 |
नागपूर | 106.03 | 92.58 |
नाशिक | 106.74 | 93.23 |
हिंगोली | 107.29 | 93.80 |
परभणी | 108.92 | 95.30 |
धुळे | 106.05 | 92.58 |
नांदेड | 108.24 | 94.71 |
रायगड | 105.96 | 92.47 |
अकोला | 106.05 | 92.55 |
वर्धा | 106.56 | 93.10 |
नंदुरबार | 106.99 | 93.45 |
वाशिम | 106. 37 | 93.37 |
चंद्रपूर | 106.14 | 92.70 |
सांगली | 105.96 | 92.54 |
जालना | 107.76 | 94.22 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).