भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले
एनएनआय या वृत्तसंस्थेने F16 विमानाच्या इंजिनाचा एका फाईल फोटोही शेअर केला आहे, जे ढिगाऱ्यात दिसत असलेल्या फोटोशी मिळतंजुळतं आहे.
भारत सरकारनेही पाकिस्तानी विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. पण पाकिस्तानने अद्याप ही बाब स्वीकारली नव्हती. इतकंच नाही तर F16 विमानाचा वापरच झाला नव्हता, असा दावाही पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्यांनी केला होता. पण पाकिस्तान ज्या अवशेषांना भारताचं विमान असल्याचा दावा करत आहे, ते GE F110 इंजिन आहे, जे F16 विमानात लावलं जातं. एनएनआय या वृत्तसंस्थेने F16 विमानाच्या इंजिनाचा एका फाईल फोटोही शेअर केला आहे, जे ढिगाऱ्यात दिसत असलेल्या फोटोशी मिळतंजुळतं आहे. फोटोमध्ये दिसणारे अवशेष F16 विमानाच्या इंजिनाचा भाग आहे. ढिगाऱ्याजवळ पाकिस्तानी अधिकारीही उभे असल्याचे दिसत असून ते 7 नॉर्दन लाईट इन्फ्रंट्रीचे आहेत.Sources: Picture of portion of downed Pakistani Air Force jet F16 from yesterday’s failed PAF raid, wreckage was in Pakistan Occupied Kashmir. Also seen in pic, Commanding Officer of Pakistan’s 7 Northern Light Infantry. pic.twitter.com/weYcB0G5eD
— ANI (@ANI) February 28, 2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र पाकिस्तानचा खोटा दावा आम्ही भारताचे दोन विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानने काल (27 फेब्रुवारी) केला होता. मात्र नंतर पाकिस्तानने कोलांटउडी मारली. पडलेलं दुसरं विमान हे भारताचं नसून पाकिस्तानचंच होतं, ज्याचा ढिगारा आता सापडला आहे. यावरुन पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तो ढिगारा F16 विमानाचाच आहे, जे भारताने पाडलं होतं. F16 हे लढाऊ विमान पाकिस्तानच्या वायूदलाचं असून ते अमेरिकेकडून खरेदी केलं होतं. पाकिस्तानी मीडियाच्या खोटरडेपणाचा पर्दाफाश ढिगाऱ्याचा हा फोटो पाकिस्तानी मीडियाने दाखवला होता आणि ते भारताचं विमान असल्याचा दावा केला होता. पण त्याच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. भारतीय वायूसेनेने हे अवशेष F16 विमानाचाच असल्याचं स्पष्ट केलं आहे.File picture of cross section of F16 engine and wreckage of downed Pakistani F16 jet pic.twitter.com/Mq78QkLTz9
— ANI (@ANI) February 28, 2019
संबंधित बातम्या
जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नकापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं
...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं