(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron News: Omicron चा धसका, सर्व राज्यं अॅक्शन मोडवर, कोणत्या राज्यांमध्ये काय आहेत नवे नियम?
Omicron News: आता सरकार अॅक्शन मोडवर आली आहे. देशातील राज्यांमध्ये आता नवे नियम पाळण्यात येणार आहेत.
Omicron News: कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हरियंटच्या दोन रूग्णांची पुष्टी देशात झाल्यानंतर आता सरकार अॅक्शन मोडवर आली आहे. देशातील राज्यांमध्ये आता नवे नियम पाळण्यात येणार आहेत. जाणून घ्या देशातील राज्यांचे नियम
दिल्लीमधील नियम
दिल्लीमध्ये 30 हजार ऑक्सिजन बेड आणि 10 हजार ICU बेड्ची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच परदेशातून आलेल्या प्रवासांची तपासणी देखील केली जात आहे.
यूपी
यूपीमध्ये एअरपोर्टवर केंद्र सरकारने जाहिर केलेल्या नियमांचे पालन होत आहे. तसेच लक्षण असणाऱ्या प्रवाशांची RT-PCR टेस्ट केली जात आहे. हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये दक्षिण अफ्रीका, बोत्स्वाना आणि जिंबाब्वे या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस आयसोलेट करण्यात येत आहे.
गुजरात
हाय रिस्क देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
पश्चिम बंगाल
15 डिसेंबर पर्यंत प्रतिबंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत आत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
बिहार
हॉस्पिटल्समध्ये हायअलर्ट . नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओमायक्रॉनचे संशयित रूग्ण
महाराष्ट्रत 28 जाणांची तपासणी
दिल्लीमध्ये 8 जाणांची तपासणी
गुजरातमध्ये एकाची तपासणी
हैदराबादमध्ये एकाची तपासणी
जयपुर नऊ जणांची तपासणी
श्रीनगरमध्ये एकाची तपासणी
त्रिचरापल्ली एकाची तपासणी
याशिवाय केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने राज्यांना सांगितले हे नियम-
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगावे.
हवाई प्रवाशांची तपासणी करावी
चाचण्या अधिक केल्या पाहिजेत.
लसीकरण जास्त करावे
कोरोना नियमांचे पालन करावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Team India South Africa Tour : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द?, BCCI घेणार निर्णय
- Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग, नव्या 75 रुग्णांसह आता 104 बाधित
- Taliban: अफगाणिस्तानमध्ये काय असणार महिलांचे अधिकार? तालिबानने जाहीर केला आदेश