Team India South Africa Tour : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द?, BCCI घेणार निर्णय
Team India South Africa Tour : ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) वाढता धोका पाहता टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत बीसीसीआय (BCCI) आज निर्णय घेईल.
Team India South Africa Tour : ओमायक्रॉन ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) वाढता धोका पाहता भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिका दौऱ्याकडे (South Africa Tour) साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत बीसीसीआय (BCCI) आज निर्णय घेईल. बीसीसीआयच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. बैठकीत भारतीय संघाच्या भविष्यातील दौऱ्यांबाबतही चर्चा केली जाईल. तसेच आजच्या बैठकीत 24 विविध मुद्यांवर विचारविनियम होणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलावाच्या तारखाही बैठकीमध्ये जाहीर केल्या जाऊ शकतात. याशिवाय टी-20 विश्वचषकातील भारताच्या खराब कामगिरीवरही बैठकीत चर्चा होणार आहे.
टीम इंडिया 9 डिसेंबरला होणार रवाना
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असून वेगाने पसरतं असल्याचं म्हटलं जात आहे. भारतासह जगभरात याबाबत खबरदारी घेतली जात आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून सापडला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र हा दौरा होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ सात आठवड्यांच्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या घरच्या मालिकेसाठी विश्रांती घेतलेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील बायोबबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाच दिवस विलगीकरणात रहावं लागणार आहे. सध्या भारताचा अ संघ दक्षिण आफ्रिकेतच असून त्यांना परत बोलावण्यात आलेलं नाही. कर्णधार विराट कोहलीनं या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट आपला शंभरवा कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन मंडळाच्या संपर्कात असून, काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं होतं.
सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर, भारतीय संघ कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे होता, परंतु टीम बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं शेवटचा कसोटी सामना खेळण्यात आला. हा कसोटी सामना आता जुलै 2022 मध्ये होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- 'ओमायक्रॉन'वर कोविड लस किती प्रभावी? कोरोनाची तिसरी लाट येणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग, नव्या 75 रुग्णांसह आता 104 बाधित
- Junior Hockey World Cup : भारताचं स्वप्न धुळीस, जर्मनीचा फायनलमध्ये प्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha