एक्स्प्लोर

Nipah Virus: केरळमध्ये निपाह व्हायरसचे पाच रुग्ण; धोका वाढल्याने मिनी लॉकडाऊन जाहीर

Kerala Nipah Update: निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 700 रुग्णांपैकी 77 जणांना हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. केरळात मिनी लॉकडाऊन देखील लावण्यात आला आहे.

Kerala Nipah Update: केरळमध्ये बुधवारी (13 सप्टेंबर) आणखी एकाला निपाहची (Nipah) लागण झाली आहे. केरळमध्ये आणखी एक निपाहबाधित रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढू लागली आहे. केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर आली आहे, त्यामुळे केरळमधील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार

केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यात पाच निपाह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 700 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 77 जणांना उच्च जोखमीच्या श्रेणीत (High Risk Category) ठेवण्यात आलं आहे.

निपाह व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना

केरळमध्ये याआधीही कोझिकोड जिल्ह्यातील दोन रुग्णांचा निपाहमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव होण्याचा धोका आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. निपाह व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी केरळ प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. हाय रिस्क कॅटेगरीत ठेवण्यात आलेल्या 77 जणांना घराबाहेर न निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सण आणि कार्यक्रमांवर बंदी

याआधी निपाहमुळे मृत्यू झालेले दोन रुग्ण ज्या रस्त्यावरुन गेले होते, त्या मार्गांची माहिती लोकांना देण्यात आली आहे, जेणेकरून इतर लोकांनी त्या मार्गाचा, त्या रस्त्याचा वापर करू नये. कोझिकोड जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

केरळमध्ये मिनी लॉकडाऊन

कोझिकोड जिल्ह्यातील 9 पंचायतींचे 58 वॉर्ड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, येथे फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी आहे. आपत्कालीन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. केवळ फार्मसी आणि रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. कंटेनमेंट झोनमधून प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बस केरळमध्ये थांबवू नये, असे आदेश देण्यात आहे.

9 वर्षांच्या मुलाला देखील निपाहची लागण

कोझिकोड जिल्ह्यातील 9 वर्षांच्या मुलाला देखील निपाहची लागण झाली आहे. हा मुलगा व्हेंटिलेटरवर असून त्याच्या उपचारासाठी सरकारने ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडीज मागवले आहेत. यावेळी केरळमध्ये पसरलेला निपाह संसर्ग हा बांग्लादेशातून आला आहे. त्याचा संसर्ग दर कमी आहे, परंतु मृत्यूचं प्रमाण जास्त आहे.

केरळमध्ये 2018 मध्येही झाला होता निपाहचा फैलाव

निपाह विषाणूचा संसर्ग माणसामधून माणसात पसरतो. 2018 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा निपाह संसर्ग पसरला, त्यावेळी निपाहमुळे 18 पैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा निपाहचा संसर्ग पसरल्याने भीतीचं वातावरण आहे, नंतर 2019 आणि 2021 मध्ये देखील केरळमध्ये निपाह रुग्ण आढळले होते.

हेही वाचा:

Nipah Virus: कोझिकोडमध्ये तापामुळे दोघांचा मृत्यू; केरळमध्ये निपाह व्हायरसचा अलर्ट, व्हायरस किती धोकादायक?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde :  टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखतABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget