एक्स्प्लोर
सर्जिकल स्ट्राईकवरुन शेखी मिरवणाऱ्या मंत्र्यांना मोदींची तंबी
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केल्याले सर्जिकल स्ट्राईकची चर्चा विविध स्तरांवर सुरु आहे. मात्र यावरुन शेखी मिरवणाऱ्या नेत्यांचे कान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपटले आहेत. अधिकृत प्रवक्त्यांनीच सर्जिकल स्ट्राईकबाबत सार्वजनिक वक्तव्य करावीत, असं मोदींनी सुनावलं आहे.
सर्जिकल स्ट्राईकवरुन उर बडवणाऱ्या आणि गरजेपेक्षा जास्त बोलणाऱ्या नेत्यांना मोदींनी सक्त ताकीद दिली आहे. विरोधी पक्षांकडून वाकयुद्ध टाळण्याच्या दृष्टीने मोदींनी ही सावध पावलं उचलली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वच पक्षांमध्ये एकजूट पाहायला मिळाली आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र मोदींकडे स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यानंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसनेही भाजप राजकीय स्वार्थापायी स्ट्राईकचा वापर करत असल्याचा आरोप केला.
दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं श्रेय लाटणं, हे असमंजसपणाचं लक्षण असल्याचं मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शाहंनी पक्षातील सर्वांनाच सुनावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement