एक्स्प्लोर

Narayan Rane | केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे म्हणाले..

केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारचे आभार मानले.

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

आता वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. माझा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास दोन मिनिटांत सांगणे सोपं नाही. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले. 

नारायण राणे यांची केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी लाडू, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राणे साहेब आगे बढो हम तुमारे साथ है! अशा घोषणा दिल्या. शिवाय फटाके फोडत मिठाईचे वाटप आपला आनंद व्यक्त केला आहे.

नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष

महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. किमान 11 जणांनी राजीनामा आत्तापर्यंत दिला आहे, अशी माहिती आहे.

अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Lok Sabha Elections 2024 Election Commission: आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा  निवडणूक आयोगाला सवाल
आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा निवडणूक आयोगाला सवाल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vinod Patil Sambhajinagar  Loksabha : छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठामABP Majha Headlines : 11 AM  :23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMantralay Education Department : शालेय खात्यातून 47 लाख 7 हजार रूपये चोरीलाSanjay Nirupam And MNS:निरुपमांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिल्यास मनसेचा विरोध,जुना वाद उफाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Lok Sabha Elections 2024 Election Commission: आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा  निवडणूक आयोगाला सवाल
आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा निवडणूक आयोगाला सवाल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
Premachi Goshta Serial Update : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
BJP Vs Shivsena: आम्ही बापाच्या दोन नंबरच्या पैशावर उडत नाही, आमच्या नादी लागलात तर... भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सदा सरवणकरांच्या मुलाला सुनावलं
आम्ही बापाच्या दोन नंबरच्या पैशावर उडत नाही, आमच्या नादी लागलात तर... भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सदा सरवणकरांच्या मुलाला सुनावलं
Sandeep Sharma:  लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक
लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळांच्या दोषमुक्तीला विरोध मात्र अद्याप आव्हान दिलेलं नाही : राज्य सरकार
छगन भुजबळांच्या दोषमुक्तीला विरोध मात्र अद्याप आव्हान दिलेलं नाही : राज्य सरकार
Embed widget