एक्स्प्लोर

Morning Headlines 15th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. Karnataka : कर्नाटकमध्ये काँग्रेस मुख्यमंत्री कोण? आमदारांनी 'या' नेत्याला दिले अधिकार

Karnataka Congress:  कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) कोण असेल याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बेंगळुरूमध्ये बोलवण्यात आली होती. ही बैठक संपली असून या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली नाही.  बैठकीत उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.  येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, तर गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

2. Wrestler Protest: कुस्तीपटूंचं स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र; काय केलीये मागणी?

Wrestler Protest News: गेल्या 22 दिवसांपासून जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे कुस्तीपटूंनी महिला खासदारांचा पाठिंबा मागितला आहे, जेणेकरून बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई करता येईल. वाचा सविस्तर 

3. Cyclone Mocha: भीषण वादळात रुपांतरीत झालं 'मोखा' चक्रीवादळ; बंगालच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा

Cyclone Mocha: मध्य बंगालच्या उपसागराला (Bay of Bengal) लागून असलेल्या अग्नेय भागांत 'मोखा' चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) तीव्र वादळात रूपांतर झालं आहे. तसेच, मोका वादळ 9 किमी ताशी वेगानं उत्तरेकडे सरकत आहे. रविवारी 14 मे रोजी मोका चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यांवर धडकलं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर

4. WTC Final 2023: ICC कडून क्रिकेटमधील 'हा' विवादित नियम रद्द; WTC फायनलपासून हद्दपार

ICC Abolish Soft Signal: क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, हा नियम 7 जूनपासून होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship: WTC) पासून हद्दपार होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये WTC फायनल होणार आहे. वाचा सविस्तर

5. Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर; झटपट चेक करा आजच्या किमती

Petrol Diesel Price Today: देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर (Petrol Diesel Price) केले आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजताच इंधनाची नवीन किंमत अपडेट केली आहे. दरम्यान, अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. नवी दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएलनं आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. मोठ्या महानगरांमध्येही किमती सारख्याच राहिल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. वाचा सविस्तर

6. GST: आता बँकिंग व्यवहारांवरही GST विभागाची नजर; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Banking Transaction: गुड अँड सर्व्हिस टॅक्स अथॉरिटी आता रिअल टाईम ऍक्सेससाठी करदात्यांच्या बँकिंग व्यवहारांवर लक्ष ठेवत आहे. याचा अर्थ असा की, बनावट पावत्या ओळखणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिट इनपुटचा वापर व्यवसाय विभागाद्वारे केला जाऊ शकतो. अलिकडेच, जीएसटी विभागाच्या तपासणीत हे उघड झालं आहे की, बनावट पावत्यांद्वारे अवाजवी कर क्रेडिट हवाला व्यवहारांसाठी वापरला जात आहे. वाचा सविस्तर 

7. 15th May In History: संत कवयित्री संत जनाबाई यांचे निधन, क्रांतीकारक सुखदेव यांचा जन्म; आज इतिहासात

15th May In History: प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. प्रत्येक दिवसाचा ऐतिहासिक दिवसांशी संबंध असतो. आजच्या दिवशी जनमानसात लोकप्रिय असलेल्या संत कवयित्री संत जनाबाई यांचे निधन झाले. तर, मराठा साम्राज्याच्या आव्हानात्मक काळात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या मराठा सेनापती खंडेराव दाभाडे यांचा स्मृतीदिनही आज आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तरुण वयात बलिदान देणारे सुखदेव यांचा जन्मदिवस आहे. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 15 May 2023: 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 May 2023: आजचा 15 मे रोजीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मेष राशींच्या लोकांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींसाठी त्यांच्या गुरुंशी संवाद साधावा लागेल. तर मिथुन राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. तसेच वृश्चिक राशींच्या लोकांसाठी व्यापारात चांगला फायदा होईल. त्याचप्रमाणे इतर राशीतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार? जाणून घेऊया आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णीदुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget