एक्स्प्लोर

Karnataka : कर्नाटकमध्ये काँग्रेस मुख्यमंत्री कोण? आमदारांनी 'या' नेत्याला दिले अधिकार

Karnataka : काँग्रेस आमदारांनी विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.

Karnataka Congress:  कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) कोण असेल याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बेंगळुरूमध्ये बोलवण्यात आली होती. ही बैठक संपली असून या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली नाही.  बैठकीत उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.  येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, तर गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत जाऊन खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. 

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. बंगळुरू येथील हॉटेल शांग्री-ला येथे काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना बाहेर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणा देत होते. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, 'आज विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून हा अहवाल हायकमांडला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास हायकमांडला वेळ लागणार आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या निरीक्षकांनी नवनिर्वाचित आमदारांची चर्चा घेत त्यांचे मत जाणून घेतले. त्याचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला सादर करण्यात येणार आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा

शनिवारी झालेल्या मतमोजणीत, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला. शनिवारी रात्री त्यांनी आपला राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही हा जनादेश स्वीकारला आहे. आमच्यातील उणीवा दूर करून पुन्हा एकदा पक्ष संघटना उभी करू आणि लोकसभेत यश मिळवू असे बोम्मई यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. कदाचित काँग्रेसने आमच्यापेक्षा अधिक चांगले प्रयत्न आणि रणनीती आखल्याने त्यांनी यश मिळवले असू शकते, असेही बोम्मई यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Sanjay Raut on Delhi Morcha: सरकार पोरांना घाबरलेय, 56 इंचवाल्यांची हातभर फा#$; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
सरकार पोरांना घाबरलेय, 56 इंचवाल्यांची हातभर फा#$; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Embed widget