एक्स्प्लोर

Horoscope Today 15 May 2023: 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 May 2023: आज कोणत्या राशींसाठी महत्त्वाचा दिवस ठरेल? मेष कर्क आणि कुंभ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 15 May 2023: आजचा 15 मे रोजीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मेष राशींच्या लोकांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींसाठी त्यांच्या गुरुंशी संवाद साधावा लागेल. तर मिथुन राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. तसेच वृश्चिक राशींच्या लोकांसाठी व्यापारात चांगला फायदा होईल. त्याचप्रमाणे इतर राशीतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार? जाणून घेऊया आजचे राशीभविष्य. 

मेष  

मेष राशीतील लोकांसाठी आजचा दिवस बरा असेल.  तुमचे कोणतेही काम तुमच्यासाठी अडचणी आणू शकते.  सामाजिक क्षेत्रातील लोकांना आज नवीन लोकांशी जोडण्याची संधी मिळेल. तुमच्या घरी तुमचा मित्रपरिवार आज एकत्र येऊ शकतो, त्यामुळे मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी आज तुमच्याकडे आहे. देवाण-घेवाणीच्या अडचणींचा तुम्ही बऱ्याच काळापासून सामना करत असला तर आज तुमची ती समस्या दूर होऊ शकते. जर तुम्ही कोणाला पैसे उधार म्हणून दिले असतील तर ते देखील तुम्हांला परत मिळतील. 

वृषभ 

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नसेल, त्यामुळे आज स्वतःला जपा. आज आरोग्याच्या तक्रारींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. ज्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबद्दल संवाद साधतील.  नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला पैशासंबंधी काही मदत मागू शकतो.

मिथुन  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे.  तुम्ही त्रस्त असल्या कारणांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकणार नाही. परंतु जर कोणाला काही शब्द दिला असले तर तो वेळीच पूर्ण करत राहा. कुटुंबातील लोकं तुमच्यावर आज पूर्ण लक्ष देतील. आज कुटुंबात काही शुभ आणि मंगलमय कार्यक्रमांचं आयोजन होऊ शकतं, ज्यामुळे परिवारातील अनेक लोक एकत्र येऊ शकतात. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संपत्ती मिळणार असल्याचे संकेत देत आहे.  तुम्ही आज नवं घर, नवं दुकान इत्यादी गोष्टींची खरेदी करु शकता. जर काही कायदेशीर प्रकरणं सुरु असतील तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आईला दिलेला शब्द वेळेनुसार पूर्ण करत राहा त्यामुळे तुम्हांला यश मिळू शकते. परंतु आज कोणत्याही कामात घाई करणे टाळा, नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात. 

सिंह

सिंह राशीची लोकं आज त्यांच्या निर्णय क्षमतेचा पूर्ण लाभ घेऊ घेतील. राजकारणात सक्रिय असलेले लोक आज त्यांच्या कामामुळे ओळखले जातील, त्यांना लोकांचा पाठिंबा देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची मतं स्पष्टपणे मांडा. तुमच्या मुलांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. कुंटुंबातील सदस्यांना नोकरीनिमित्त बाहेर जावे लागू शकते. तुम्ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कोणतीही महत्त्वाची गोष्ट सांगू नका. 

कन्या 

कन्या राशीच्या  लोकांसाठी आजचा दिवस प्रगती करणारा असेल. सासरकडून तुम्हांला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला तरी पैसे दिले असतील तर ते  तुम्हांला परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. तुमचा एखादा मित्र आज तुमच्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित काही माहिती घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात लावली तर तुम्हांला फायदा होऊ शकतो. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या काही कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. ज्यामुळे तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात. आई आज एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकते.  तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत चिंतित होऊ राहाल. परंतु तुम्ही तुमच्या मित्राशी कोणत्याही महत्त्वाच्या समस्यांबद्दल संवाद साधाल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.  तुम्हांला तुमच्या मित्रपरिवाराला भेटण्याची संधी देखील मिळेल. तुमच्या मुंलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवहाराशी संबंधित कोणतीही बाब आज बाहेरच्या व्यक्तीसमोर आणू नका. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. आज तुमचे कोणतेही जुने काम पूर्ण होऊ शकते. आज तुमच्या कामातील उर्जेमुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो.  परंतु जर कोणत्या गोष्टीबाबत तुमच्या मनात संभ्रम असतील तर तुम्ही ती गोष्ट करु नका. जर तुम्हांला आज कोणाकडून पैसे हवे असतील तर ते देखील तुम्हांला सहज मिळू शकतात. परंतु तुमची कोणतीही जुनी चूक तुमच्या कुटुंबासमोर येऊ शकते. 

मकर

मकर राशींच्या लोकांची व्यवसायातील प्रगती आज जरा कमी होईल. परंतु नंतर ते देखील चांगला फायदा मिळवतील. तुम्ही तुमच्या मिळकतीचा काही भाग दान देखील करु शकता.  जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर त्यावर काळजीपूर्वक स्वाक्षरी करा. आईची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही चिंतेत असू शकता. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक त्रासातून सुटका होईल.  आज तुमच्या भावांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा करत असाल तर त्यामुळे तुम्हांला अडचणी निर्माण होऊ शकतात.  व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे लागेल, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.  परंतु मुलाच्या लग्नात काही अडथळे असतील तर ते आज दूर होऊ शकतात.   नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रगती मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी दिवस तणावपूर्ण असणार आहे. आज तुमच्यावर कामाच्या ठिकाणी कामाचा भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्रस्त देखील होऊ शकता. पण जर तुमच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली तर तुम्ही ती पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला मुलांच्या बाबतीत कोणतीही महत्त्वाची माहिती मिळू शकते. परंतु तुम्ही कोणालाही पैसे देणे टाळावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओAjit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget