एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट प्रफुल पटेल यांनी 10 दिवसांपूर्वी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात भेट झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रफुल पटेल हे काही दिवसांपूर्वी 6 जनपथ येथे गेले होते. त्यावेळी काही विषयांवर चर्चा झाली होती. आज अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. गेल्या वर्षी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांचा वाढदिवस झाला होता, तेव्हा अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी शरद पवारांना भेटणं टाळलं होतं.  मधल्या काळात छगन भुजबळ शरद पवारांना मराठा आणि ओबीसी संघर्षाच्या संदर्भात भेटण्यासाठी गेले होते. प्रफुल पटेल 10 दिवसांपूर्वी  शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. प्रफुल पटेल हे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात समन्वयाचं काम करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट जेव्हा भाजपसोबत चर्चा करत होता तेव्हा प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्या होत्या. त्यामुळं प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतरची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

सातत्यानं निवडणुकीत ज्यांच्यावर टीका केली ती मंडळी कशी एकत्र येतात असा प्रश्न उपस्थित केल्यास अजित पवार यांच्याकडून  1999 मधील उदारहण दिलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावेळी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती, मात्र त्यांच्या काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं होतं.  आज शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ हे नेते आज 6 जनपथ येथे गेल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय होणार ते पाहावं लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांमध्ये महायुतीसोबत जाण्याबाबत सूर होता अशा चर्चा होत्या. 4 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदांरांच्या सोबत एक बैठक पार पडली होती. प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्या भेटीच्या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात काय घडणार हे पाहावं लागेल. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे खासदारांची संख्या देखील महत्त्वाची असल्यानं नेमकं काय घडणार याकडे लक्ष लागलं आहे. केंद्रातील राजकारण लक्षात घेता पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

इतर बातम्या :  

Sharad Pawar & Ajit Pawar : मोठी बातमी: अपने तो अपने होते है! शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अजित पवार सहकुटुंब 6 जनपथवर पोहोचले

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
Bihar Election Result 2025: ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CMST Bag Found :  मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Devendra Fadnavis On Bihar Election : लोकांचा विश्वास मोदींवर, काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे
Nashik Leopard Attack नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ,हल्ल्यात 2 नागरिक जखमी; वनविभागाचे प्रयत्न
Amit Satam Speech  :  ठाकरे बंधू मुंबईचे डाकू; अमित साटमांच जहरी भाषण
Vinod Tawde Bihar Election : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का? विनोद तावडे Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
Bihar Election Result 2025: ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Embed widget