एक्स्प्लोर

Morning Headlines 4th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी

Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्र प्रकरणावरुन (MLA Disqualification Case) सध्या राजाच्या राजकारणात (Maharashtra Politics) गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणासंदर्भातील अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार होती. वाचा सविस्तर 

राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला

Maharashtra Local Body Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Body Elections) आणि ओबीसी आरक्षणाबाबतची (OBC Reservation) सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका (Maharashtra Elections) पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. गेल्या दीड वर्षात या प्रकरणी एकदाही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाचा सविस्तर

'न्यूजक्लिक'चे संस्थापक प्रबिर पुरकायस्थ यांच्यासह 2 जणांना अटक; काही पत्रकारांचे लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त, कार्यालयही सील

China Funding Row : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी 'न्यूजक्लिक' या न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) तसेच फर्मचे शेअरहोल्डर अमित चक्रवर्ती यांना दहशतवादविरोधी कायद्यानुसार बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली. न्यूजक्लिक आणि त्याच्या पत्रकारांशी संबंधित 30 परिसरांवर दिवसभर छापे टाकून चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात स्पेशल सेलच्या कार्यालयात अनेक आरोपींची चौकशी सुरू राहणार आहे. वाचा सविस्तर 

Gayatri Joshi : 'स्वदेश' अभिनेत्रीचा इटलीत कार अपघात; स्विस कपलने गमावला जीव

Gayatri Joshi Accident : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'स्वदेश' (Swades) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गायत्री जोशी (Gayatri Joshi) सध्या चर्चेत आहे. इटलीमध्ये (Italy) अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी गायत्रीसोबत तिचे पती विकास ओबेरॉयदेखील होते. गायत्री आणि विकास या अपघातातून थोडक्यात बचावले असून दुसऱ्या कारमधील स्विस कपलचा मात्र मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर 

Mohamed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक, विजयानंतर पुन्हा 'इंडिया आऊट'चा नारा; भारताची डोकेदुखी वाढली

Maldives New President Mohammed Muizzu : मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzu) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक (China Supporter) असून त्यांनी विजयानंतर भारताविरोधात वक्तव्य (India) करत चीनसोबतचे घनिष्ट संबंध दाखलून दिले आहेत. चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती बनल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. विजयानंतरच्या भाषणात त्यांचं चीनच्या बाजूने असलेलं झुकत माप असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या भाषणात मालदीवमधून भारतीय सेना हटवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर 

Vande Bharat Express : आता वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणखी आरामदायी होणार, स्लीपर कोचची सुविधा; राजधानी एक्सप्रेसपेक्षा हटके डिझाईन

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) सुसाट प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. आता वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच (Sleeper Coach) उपलब्ध करण्यात येणार आहेत. वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोचची (Vande Bharat Express Sleeper Coach) डिझाईन राजधानी आणि इतर एक्सप्रेस ट्रेनपेक्षा हटके असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास आणखी आरामदायी स्लीपर कोचने लवकरच प्रवास करता येणार आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोचची सुविधा नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. वाचा सविस्तर 

Thalaivar 170 : अमिताभ बच्चन अन् रजनीकांत 32 वर्षांनी एकत्र झळकणार; 'थलाइवर 170'चं पोस्टर आऊट!

Amitabh Bachchan And Rajinikanth On Thalaivar 170 : सिनेजगतातील दोन दिग्गज एकत्र रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) 'थलाइवर 170' (Thalaivar 170) या सिनेमाच्या माध्यमातून 32 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांनी अमिताभ आणि रजनीकांतची जोडी एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा होत होत्या. पण आता 'थलाइवर 170'च्या निर्मात्यांनी नवं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वाचा सविस्तर 

4th October In History: अभिनेते अरुण सरनाईक यांचा जन्म, मानवाने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला; आज इतिहासात...

4th october In History : आजचा दिवस मानवासाठी अतिशय खास आहे. अंतराळ विज्ञानाच्यादृष्टीने आज महत्त्वाचे पाऊल मानवाने टाकले. सोव्हिएत रशियाने जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. तर, मराठी रंगभूमीवर अभिनेते गायक अरुण सरनाईक यांचा आज जन्मदिन आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 04 October 2023 : आजचा बुधवार कसा राहील, कोणत्या राशीला होईल लाभ? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 04 October 2023 : आज 04 ऑक्टोबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आज आरोग्यासंबंधी थोडीशी समस्या आली तर त्यांनी डॉक्टरकडे जावे. तूळ राशीच्या तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमचे मन प्रसन्न राहील. इतर राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget