(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gayatri Joshi : 'स्वदेश' अभिनेत्रीचा इटलीत कार अपघात; स्विस कपलने गमावला जीव
Gayatri Joshi Accident : बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीमध्ये अपघात झाला आहे.
Gayatri Joshi Accident : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'स्वदेश' (Swades) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गायत्री जोशी (Gayatri Joshi) सध्या चर्चेत आहे. इटलीमध्ये (Italy) अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी गायत्रीसोबत तिचे पती विकास ओबेरॉयदेखील होते. गायत्री आणि विकास या अपघातातून थोडक्यात बचावले असून दुसऱ्या कारमधील स्विस कपलचा मात्र मृत्यू झाला आहे.
गायत्री तिच्या पतीसोबत अर्थात विकास ओबेरॉयसह (Vikas Oberoi) इटलीला फिरायला गेली होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. द फ्री जर्नलच्या रिपोर्टनुसार, इटलीमधील सार्डिनिया (Sardinia) परिसरात हा अपघात झाला आहे. गायत्री आपल्या पतीसोबत लेम्बोर्गिनी कारमध्ये होती. तर स्विस कपलकडे फेरारी होती.
'या' कारणाने झाला अपघात (Gayatri Joshi Accident Reason)
गायत्री जोशीच्या अपघाताचा (Car Accident) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गायत्री आपल्या पतीसोबत लेम्बोर्गिनी गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. तर दुसरीकडे स्विस कपल फेरारी चालवताना दिसत आहे. गायत्री आणि स्विस कपल दोघेही एक मिनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी या दोन्ही गाड्या एकमेकांना धडकल्या.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
द फ्री जर्नलसोबत बोलताना गायत्री म्हणाली की,"विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. इथे आमचा अपघात झाला असून देवाच्या कृपेने आम्ही बचावतो आहोत. पण या अपघातात. एक स्विस कपलने मात्र आपला जीव जमावला आहे". मीडिया रिपोर्टनुसार, 63 वर्षीय मेलिसा क्रौटली आणि 67 वर्षीय मार्कस क्रौटली यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
'स्वदेश'नंतर बॉलिवूडला केला रामराम (Who is Gayatri Joshi)
गायत्री जोशीने (Gayatri Joshi Movies) 2004 मध्ये 'स्वदेश' (Swades) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पहिलाच सिनेमा तिला किंग खानसोबत करता आला. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम केला आणि मेमेजिंग डायरेक्टर विकास ओबेरॉयसोबत लग्नबंधनात अडकली. गायत्री जोशीने आपल्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये मॉडेल म्हणून केली होती. 2000 मध्ये ती 'मिस इंडिया इंटरनॅशनल'ची मानकरी ठरली होती. गायत्रीने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करावं अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या