Thalaivar 170 : अमिताभ बच्चन अन् रजनीकांत 32 वर्षांनी एकत्र झळकणार; 'थलाइवर 170'चं पोस्टर आऊट!
Thalaivar 170 : 'थलाइवर 170' या सिनेमात रजनीकांत (Rajinikanth) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एकत्र झळकणार आहेत.
Amitabh Bachchan And Rajinikanth On Thalaivar 170 : सिनेजगतातील दोन दिग्गज एकत्र रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) 'थलाइवर 170' (Thalaivar 170) या सिनेमाच्या माध्यमातून 32 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांनी अमिताभ आणि रजनीकांतची जोडी एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा होत होत्या. पण आता 'थलाइवर 170'च्या निर्मात्यांनी नवं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
'थलाइवर 170'चं नवं पोस्टर आऊट! (Thalaivar 170 New Poster Out)
'थलाइवर 170' या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या कृष्णधवल पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. लाइका प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत 'थलाइवर 170' या सिनेमाची निर्मिती होत आहे. निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"भारतीय सिनेसृष्टीत शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे 'थलाइवर 170' टीममध्ये स्वागत आहे. अमिताभ बच्चन यांच्यामुळे 'थलाइवर 170' हा सिनेमा वेगळ्या उंचीवर पोहचेल".
Welcoming the Shahenshah of Indian cinema ✨ Mr. Amitabh Bachchan on board for #Thalaivar170🕴🏼#Thalaivar170Team reaches new heights with the towering talent of the one & only 🔥 @SrBachchan 🎬🌟😍@rajinikanth @tjgnan @anirudhofficial #FahadhFaasil @RanaDaggubati… pic.twitter.com/BZczZgqJpm
— Lyca Productions (@LycaProductions) October 3, 2023
'थलाइवर 170' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह राणा डग्गुबाती (Rana Daggubati) आणि 'पुष्पा' फेम फहद फासिल (Fahadh Faasil) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. राणा आणि फहद यांचेही पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहेत. राणाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"उत्कृष्ट दर्जाच्या अभिनेत्याचं टीममध्ये स्वागत". राणाने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"सुपरकूल टॅलेंटेड अभिनेता राणा डग्गुबातीचं स्वागत...डॅशिंग राणामुळे सिनेमाला चार चांद लागतील".
'हम' नंतर आता गाजवणार 'थलाइवर 170'
अमिताभ बच्चन आणि रजनीकांतची जोडी 1991 मध्ये आलेल्या 'हम' या सिनेमात एकत्र झळकली होती. त्यानंतर दोघांनाही एकत्र काम केलं नाही. पण तरी एकमेकांच्या कामाचं ते कायम कौतुक करत राहिले. आता त्यांच्या 'थलाइवर 170' या सिनेमात ते एकत्र झळकणार आहेत.
तगडी स्टारकारस्ट असलेला 'थलाइवर 170' (Thalaivar 170 Starcast)
'थलाइवर 170' या सिनेमात रजनीकांत, अमिताभ बच्चन, राणा डग्गुबाती, फहद फासिल यांच्यासह मंजू वारियर, दुशारा विजयन आणि रितिका सिंहदेखील झळकणार आहेत. अनिरुद्ध रविचंदन यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. टीजे गनानवेल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 2024 मध्ये हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या