एक्स्प्लोर

Morning Headlines 3rd October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

चिनी फंडींग प्रकरणी दिल्लीत NewsClick च्या पत्रकारांच्या घरांवर पोलिसांच्या धाडी; अनेकांचे मोबाईल, लॅपटॉपही जप्त

China Funding Row: दिल्लीत (Delhi) अनेक पत्रकार (Journalist) आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकानं छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. पत्रकार अभिसार शर्मा (Journalist Abhisar Sharma) यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तसेच, संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरीही पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. यातल्या काही पत्रकारांना पोलीस स्टेशनलाही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिनी फंडिंग संदर्भात आरोप न्यूज लिंकवर करण्यात आले होते. त्यानंतर ईडीनं एक केसही दाखल केली होती. वाचा सविस्तर 

Maharashtra: भाजप हजारो कोटी प्रचारावर खर्च करते, पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड रुग्णालयातील प्रकारानंतर राहुल गांधींचा थेट सवाल

Nanded News: महाराष्ट्रातील (Maharashtra News) नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या डीननं यामागे औषधं आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं कारण सांगितलं आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शंकरराव चव्हाण यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू हे सर्पदंशामुळे झाले आहेत. याच घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार हजारो कोटी प्रचारावर खर्च करते, पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? असा परखड सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर 

Jammu Kashmir Encounter : राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार, तीन जवान जखमी; लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

Terrorists Search Operation : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये सध्या तणाव कायम आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली आहे. सोमवारी जम्मूतील राजौरी जिल्ह्यामध्ये (Rajouri district) सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक झाली. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कालाकोट (Kalakote) येथे शोध मोहिमेदरम्यान (Terrorist Search Operation) सुरक्षा दल (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) रात्री उशिरा चकमक झाली. वाचा सविस्तर 

China-Pakistan Moon Mission : चंद्रावर जाण्यासाठी 'ड्रॅगन' पाकिस्तानला मदत करणार, चीनचा नेमका प्लॅन काय?

China Moon Mission : चीन (China) आगामी चंद्र मोहिमेसाठी (Lunar Mission) सज्ज झाला आहे. चीन या चंद्रमोहिमेद्वारे पाकिस्तानलाही (Pakistan) मदत करणार आहे. चीन 2024 मध्ये चांग ई-6 ही चंद्र मोहिम (China Chang e-6 Lunar Moon Missio) राबवणार आहे. या चंद्र मोहिमेद्वारे चीन पाकिस्तानलाही चंद्रावर पोहोचण्यासाठी (China Lunar Mission) मदत करणार आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने सांगितलं आहे की, चांग ई-6 मिशनद्वारे पाकिस्तानचाही एक पेलोड चंद्रावर नेण्यात येणार आहे. या चीन आणि पाकिस्तानच्या या संयुक्त मोहिमेद्वारे दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. चीन आणि पाकिस्तानच्या या मोहिमेकडे दोन मित्र देशांमधील अंतराळ क्षेत्रात वाढणारे सहकार्य म्हणून पाहिलं जात आहे. वाचा सविस्तर 

पोटच्या तिन्ही मुलींना संपवलं, भल्यामोठ्या ट्रंकमध्ये ठेवलं अन्... जन्मदात्या आई-वडिलांनीच रचला कट

Punjab Crime News: एका ट्रंकमध्ये तीन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं सोमवारी पंजाब (Punjab News) पुरतं हादरलं. पंजाबच्या (Punjab) जालंधरमधील (Jalandhar) कानपूर गावात सोमवारी सकाळी तीन मुलींचे मृतदेह एका ट्रंकमध्ये आढळून आले. तिन्ही मुलींना त्यांच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच ठार मारल्याची माहिती सध्या मिळत आहे. ट्रंकमध्ये ज्या तीन मुलींचे मृतदेह आढळून आले, त्या तिघीही सख्या बहिणी असून त्यांचं वय 5 ते 9 वर्षे होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं तपासाची सूत्रं हलवली. त्यानंतर पोलिसांच्या संशयाची सुई वडिलांवर येऊन थांबली आणि त्यांनी मुलींच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पण चौकशीअंती जे समोर आलं, ते सर्वांनाच हादरवणारं होतं. वाचा सविस्तर 

Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मंजुरी, R21/Matrix M लस स्वस्त आणि प्रभावी

WHO Recommends Malaria Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोगावरील R21/Matrix-M या दुसऱ्या लसीला मंजुरी दिली आहे. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. मलेरियाची R21/Matrix-M ही नवी लस स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने दोन तज्ज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार या लसीला मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मलेरिया संशोधक म्हणून मी त्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा आपल्याकडे मलेरियाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल. आता आपल्याकडे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी दोन लसी आहेत. मलेरियाचा धोका असलेल्या मुलांमध्ये ही लस वापरण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. वाचा सविस्तर

3rd october In History : लोकसभेतील पराभवानंतर इंदिरा गांधींना अटक, बर्लिन भिंतीचा पाडाव आणि जर्मनीचे एकीकरण; आज इतिहासात

3rd october In History : आजचा दिवस हा भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव करून जनता सरकार सत्तेत आलं. त्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 3 ऑक्टोबर 1977 रोजी इंदिरा गांधींना अटक केली. त्याचसोबत जगाचा इतिहास आणि भूगोल बदलणाऱ्या बर्लिनच्या भिंतीचा पाडाव हा आजच्याच दिवशी झाला होता. वाचा सविस्तर 

Horoscope Today 03 October 2023 : मंगळवारी 'या' राशीच्या लोकांना आर्थिक हानीचा इशारा, आजचे राशीभविष्य जाणून घ्या 

Horoscope Today 03 October 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 03 ऑक्टोबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. तूळ राशीच्या लोकांना वाहन चालवताना दुखापत होऊ शकते. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील. इतर राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget