Chandrayaan-3 : भारताची चांद्रयान मोहिम चीनच्या जिव्हारी, 'ड्रॅगन' चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पाठवणार रोबोट
China Moon Mission : भारता शेजारील देश चीन (China) भारताला टक्कर देण्याची तयारी करत आहे. भारतानंतर (Chandrayaan-3) आता चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोबोट पाठवणार आहे.
China Chang E-6 : भारताने (India) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेद्वारे नवा इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत (First Country to Land on Moon's South Pole) पहिला देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एका मागोमाग एक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहे. इस्रोच्या मोहिमांचं जगभरात कौतुक होत असताना चीन मात्र काहीसा नाखूश आहे, असं म्हणावं लागेल. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यानंतर आता चीनही दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोबोट पाठवणार आहे.
चीन महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेसाठी सज्ज
भारताच्या चांद्रयान-3 च्या यशाची जगभरात चर्चा सुरु आहे. चंद्र मोहिमेसोबतच इस्रोकडून इतरही अनेक मोहिमांवर काम सुरु आहे. भारताचं यश पाहून शेजारी देश चीन चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. आता चीनने चांगई-6 या आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. चीनची महत्वाकांक्षी चंद्रमोहिम पुढच्या वर्षी 2024 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. चिनी अंतराळ संस्थेनं सांगितलं की, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्यासाठी चीन चांग ई-6 (China Chang E-6 Mission) मोहिमेद्वारे विविध देशांचे उपग्रह अंतराळात नेणार आहे.
दक्षिण ध्रुवावरून नमुने परत आणणार
ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, चिनी अंतराळ संशोधन संस्था (China National Space Administration) म्हणजेच चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) ने शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी या मोहिमेची घोषणा केली आहे. यावेळी CNSA ने (China National Space Administration) सांगितलं की, ''ही चंद्रावरील चीनची पुढील रोबोटिक मोहीम असेल. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दुर्गम भागातून म्हणजेच दक्षिण ध्रुवावरून नमुने परत आणणे असणार आहे, ज्याबद्दल लोकांना कोणतीही माहिती नाही.''
एटकेन बेसिनमध्ये उतरण्याची योजना
CNSA नुसार, दूरची बाजू सामान्यतः जुनी असते आणि त्यात एटकेन बेसिनचा समावेश होतो, जो तीन प्रमुख चंद्राच्या भूरूपांपैकी एक आहे, ज्यामुळे ते महत्त्वपूर्ण आहे. चाँगई-6 मोहिमेसाठी लँडिंग क्षेत्र चंद्राच्या दूरच्या बाजूला दक्षिण ध्रुव-एटकेन बेसिन येथे ठेवण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत, अंतराळ यान आणि पृथ्वी यांच्यातील उत्तम संवाद सुनिश्चित करण्यासाठी, चीनने Qiqiao-2 रिले कम्युनिकेशन उपग्रह विकसित केला आहे, जो 2024 च्या मध्यात प्रक्षेपित करण्याची योजना आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :