एक्स्प्लोर

Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मंजुरी, R21/Matrix M लस स्वस्त आणि प्रभावी

R21/Matrix M Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया रोगावरील R21/Matrix-M या दुसऱ्या लसीला परवानगी दिली आहे. ही लस अनेक देशांमध्ये मलेरियाशी लढण्यास मदत करू शकते, जी पहिल्या लसीपेक्षा स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे.

WHO Recommends Malaria Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोगावरील R21/Matrix-M या दुसऱ्या लसीला मंजुरी दिली आहे. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. मलेरियाची R21/Matrix-M ही नवी लस स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने दोन तज्ज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार या लसीला मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मलेरिया संशोधक म्हणून मी त्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा आपल्याकडे मलेरियाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल. आता आपल्याकडे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी दोन लसी आहेत. मलेरियाचा धोका असलेल्या मुलांमध्ये ही लस वापरण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. 

मलेरियावरील नव्या लसीला WHO कडून मंजुरी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII-Serum Institute of India) ने मलेरियावरील ही नवीन लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने इंडियन सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने मलेरियावर एक नवीन लस विकसित केली आहे. मलेरियावरील या लसीचं नाव R21/Matrix-M असून याचे तीन डोस आहेत. या संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, ही लस 75 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे आणि बूस्टर डोससह, किमान आणखी एक वर्ष संरक्षण मिळेल. टेड्रस यांनी सांगितलं की, या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे 2 ते 4 डॉलर्स म्हणजेच 160 ते 320 रुपये असेल. 

लहान मुलांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी R21/Matrix-M लस

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने लहान मुलांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी R21/Matrix-M या नवीन लसीची शिफारस केली आहे. R21/Matrix-M लस ही WHO ने शिफारस केलेली दुसरी मलेरिया लस आहे. याआधी RTS,S/AS01 या मलेरियावरील पहिल्या लसीला 2021 मध्ये WHO कडून मंजुरी मिळाली होती. आता या दोन्ही लसी जगभरातील अनेक देशांमध्ये मलेरिया रोखण्यात मदत करतील. स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑन इम्युनायझेशन (SAGE) आणि मलेरिया पॉलिसी अॅडव्हायझरी ग्रुप (MPAG) आणि 25-29 सप्टेंबर रोजी झालेल्या नियमित द्विवार्षिक बैठकीनंतर WHO महासंचालकांनी या लसीला मान्यता दिली आहे.

मलेरियामुळे दरवर्षी अनेक लहान मुलांचा मृत्यू

अलिकडच्या काळात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे, त्या पार्श्वभूमीवर ही लस महत्वाची ठरणार आहे. मलेरियामुळे दरवर्षी अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो. भविष्यात हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने विविध योजनाही राबवल्या जात आहेत. आफ्रिकन प्रदेशातील मुलांमध्ये मलेरिया रोगाचा जास्त परिणाम दिसून येतो, येथे दरवर्षी लाखो मुलांना प्राण गमवावे लागतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडेSanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोपRaksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget