एक्स्प्लोर

Morning Headlines 21th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Hsc Exam 2024 : विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा

Maharashtra HSC exams 2024 : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 15 13 हजार 909 विद्यार्थी परीक्षेला सामोरं जाणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. वाचा सविस्तर...

Sharad Pawar : मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका

Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. असं असताना हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी शंका व्यक्त केली आहे. राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

Weather Update : पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाची शक्यता, IMD ने या भागात वर्तवला पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast : देशात कुठे थंडी (Winter) तर कुठे पावसाची (Rain) रिमझिम असं वातावरण पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रासह देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यासह काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुके (Cold Weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात काही ठिकाणी आज पावसाची हजेरी (Rain Prediction) पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. तर, बहुतांश भागात कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. वाचा सविस्तर...

Farmers Protest : शेतकऱ्यांचं दिल्लीच्या दिशेने कूच! रस्त्यावर खिळे आणि सिमेंटची भिंत, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारची तयारी

Farmers Protest Latest Update : शेतकरी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन (Farmers Agitation) तीव्र करणार आहे. बुधवारपासून शेतकरी दिल्लीच्या (Delhi News) दिशेने वेगाने कूच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 'चलो दिल्ली'चा (Chalo Delhi) नारा देत शेतकरी आंदोलनावर कायम असून आजपासून आंदोलन तीव्र करतील. केंद्र सरकार (Central Government) आणि शेतकरी संघटना (Farmers Association) यांच्यातील बैठक पुन्हा एकदा निष्फळ झाली. शेतकरी संघटनांना मोदी सरकारचा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सीमेच्या दिशेने शेतकरी पुढे जात असल्याने पोलीस आणि प्रशासन अलर्टवर आहे. वाचा सविस्तर...

भारताला धक्के पे धक्का! केएल राहुलनंतर आता बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर! 

IND vs ENG 4th Test : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार (Jasprit Bumrah released from squad for 4th Test)  नाही. बीसीसीआयनं (BCCI) केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दलचं अपडेट दिलं आहे. केएल राहुल दुखापतीमधून अद्याप सावरला नाही. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटीत आराम देण्यात येणार आहे, असे बीसीससीआयनं सांगितलं आहे. वाचा सविस्तर...

Kohli Retirement : 'कोहली'ची क्रिकेटमधून निवृत्ती; 'विराट'च्या कॅप्टन्समध्ये जिंकलेला अंडर 19 वर्ल्डकप

Taruwar Kohli Retirement News: काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्डकप 2024 (Under 19 World Cup 2024) च्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कांगारूंनी (IND vs AUS) मोठ्या शिताफिनं पराभव केला. पम, भारतीय युवा क्रिकेट संघाच्या पोरांनी साऱ्यांची मनं जिंकली. पण जरा मागे वळून पाहिलं तर, यापूर्वी टीम इंडिया पाच वेळा अंडर 19 वर्ल्डकप जिंकली आहे. वाचा सविस्तर...

Dadasaheb Phalke Awards 2024 Winners List : शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेता, बॉबी देओल सर्वोत्कृष्ट खलनायक, पाहा संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2024 Winners : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा बॉलिवूडमदील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील स्टार्स या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ या पुरस्काराच्या रूपाने मिळतं. मंगळवारी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं वितरण झालं. बॉलिवडूचा किंग खान शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणूनरस्कार प्रदान करण्यात आला. शाहरुख खानं यानं ज्यूरीचं आभार व्यक्त केले. बॉबी देओल आणि संदीप रेड्डी वांगा यांना अॅनिमल चित्रपटासाठी गौरवण्यात आले. वाचा सविस्तर...

21 February In History : जागतिक मातृभाषा दिन घोषित, लाहोर घोषणापत्रावर भारत आणि पाकिस्तानची स्वाक्षरी; आज इतिहासात

21 February In History : आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. भारताच्या संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये मसुदा समितीने 21 फेब्रुवारी 1948 रोजी घटनेचा मसुदा हा घटना समितीला सादर केला. अमेरिकेतील वादग्रस्त कृष्णवर्णीय नेते माल्कम एक्स यांची आजच्याच दिवशी हत्या करण्यात आली. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 21 फेब्रुवारी या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील वाचा सविस्तर...

आजचा बुधवार खास, ‘या’ राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं लागतील मार्गी, वाचा 12 राशींचे भविष्य

Horoscope Today 21  February 2024 : आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला (Daily Horoscope)  मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget