एक्स्प्लोर

भारताला धक्के पे धक्का! केएल राहुलनंतर आता बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर! 

IND vs ENG 4th Test : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

IND vs ENG 4th Test : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार (Jasprit Bumrah released from squad for 4th Test)  नाही. बीसीसीआयनं (BCCI) केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दलचं अपडेट दिलं आहे. केएल राहुल दुखापतीमधून अद्याप सावरला नाही. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटीत आराम देण्यात येणार आहे, असे बीसीससीआयनं सांगितलं आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील तीन सामने झाले आहेत. इंग्लंडनं (IND vs ENG) पहिल्याच कसोटी मालिकेत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जोरदार पलटवार दिला. विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. राजकोट कसोटी सामन्यात भारताने 434 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे चौथी कसोटी सामना होणार आहे. पण या कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल हे अनुभवी खेळाडू दिसणार नाहीत. 

सिराज करणार गोलंदाजीचं नेतृत्व - 

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. सिराजच्या जोडीला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला संधी मिळते? हे पाहणं औत्सुयक्याचं असेल. मुकेश कुमार आणि आकाशदीप असे दोन पर्याय रोहित शर्माकडे उपलब्ध आहे. या दोघांपैकी कुणाला संधी मिळेल, हे काही दिवसांतच समजेल. आकाशदीप पदार्पण कऱणार का? की मुकेश कुमार याला संधी मिळणार? हे काही दिवसांत स्पष्ट होईल. 

बीसीसीआयनं काय म्हटलं ? 

Jasprit Bumrah released from squad for 4th Test : रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह याला भारतीय चमूतून रिलिज करण्यात आलं आहे. इंग्लंडविरोधातील पाच सामन्याची कसोटी मालिकेचा वेळ आणि मागील काही दिवसांमध्ये जसप्रीत बुमराह यानं मोठ्या प्रमणात क्रिकेट खेळलेय, ते पाहून जसप्रीत बुमराहला रिलिज करण्यात आलेय. 

दरम्यान, केएल राहुल (KL Rahul is ruled out) चौथ्या कसोटीतून बाहेर गेलाय. तो धरमशाला येथे होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघासोबत जोडला जाईल. त्याची फिटनेस व्यवस्थित असेल तरच तो अखेरच्या कसोटी सामन्यात सहभाग घेईल. 

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आराम देण्यात आलेला मुकेश कुमार रांची कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात दाखल झालाय. 

India’s updated squad for the 4th Test:  रांची कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगट सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप

Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget