एक्स्प्लोर

आजचा बुधवार खास, ‘या’ राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं लागतील मार्गी, वाचा 12 राशींचे भविष्य

Horoscope Today 21 February 2024 : आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 21  February 2024 : आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला (Daily Horoscope)  मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...  

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today) 

नोकरी (Job) -  मेष राशीच्या लोकांता आजचा  दिवस चांगला जाणार आहे.  कर्म बलवान राहील. भाग्याची साथ लाभेल. उत्तरार्धात अर्थप्राप्ती वाढेल. नवीन मित्र वाढेल. कायमस्वरुपाची नोकरी मिळेल. विवाह जुळेल. परदेशगमनाची संधी लाभेल. अवास्तव खर्च होईल. नोकरीत बदलाची शक्यता आहे. 

व्यवसाय (Buisness) -   व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात काही नुकसान होऊ शकते. पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी आधी अनेक वेळा विचार करा. तरुणांबद्दल सांगायचे तर आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर जर तुम्ही नशा, तंबाखू, गुटखा इ.चे सेवन करत असाल तर तुम्हला यकृत किंवा किडनीशी संबंधित  समस्या तुम्हाला उद्भवू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

वृषभ  (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चा करणे टाळा आणि कोणाबद्दलही  वाईट बोलू नका.  

व्यवसाय (Buisness) - व्यावसायिकांबद्दल सांगायचे  तर व्यवसाय करत असतील किंवा कोणताही करार करत असाल तर तुम्ही आज अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.  समोरची व्यक्ती तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न देखील करू शकते.  ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

आरोग्य (Health) - आरोग्याविषयी बोलायचे तर  तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.  आवश्यकतेशिवाय घराबाहेर  पडणे टाळा.  घरातील कामामध्ये मदत करा.  तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. 

मिथुन  (Gemini Horoscope Mitun Rashi Today) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर  तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहावे, कोणतेही काम पूर्ण करण्यात घाई करू नये, अन्यथा घाई केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळू शकतात. 

व्यवसाय (Buisness) -   व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, जर व्यावसायिकांनी फॅशन डिझायनिंगशी संबंधित काम केले तर त्यांना ते काम अधिक उत्पन्न मिळू शकते.

  लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, तो जे काही बोलेल त्यात व्यत्यय आणू नका, त्याचे संपूर्ण बोलणे ऐकूनच कोणतीही प्रतिक्रिया द्या.  

आरोग्य (Health) - आरोग्याविषयी बोलायचे तर जर डॉक्टरांनी तुम्हाला कोणत्याही आजारामुळे काही गोष्टी  वर्ज्य करण्याचा सल्ला दिला असेल, तर तुम्ही त्या गोष्टी वर्ज्य करा.  तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

कर्क (Cancer Today Horoscope)  

नोकरी (Job) -  नोकरदारांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. तुम्हाला कोणतेही काम सोपवले असेल तर त्याची धोरणं आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्या. आज तुम्ही शांत राहून कोणतीही समस्या सोडवली तर ती तुम्हाला सहज झेपू शकते.

व्यवसाय (Buisness) - आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज व्यवसायात घाई करू नका, नाहीतर तुम्हाला काम करताना अडचणी येतील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तळलेले पदार्थ खाणं टाळा आणि फक्त घरी घरचं शिजवलेलं अन्न खा.

सिंह (Leo Today Horoscope)  

नोकरी (Job) -  नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला तुमच्या नोकरीत उच्च पदासाठी संधी मिळू शकते. तुमचे सहकारी तुमचा हेवा करतील आणि तुमचे विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.  

व्यवसाय (Buisness) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, आज त्यांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा मिळेल. व्यापार्‍यांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. 

आरोग्य (Health) - आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला काही प्रकारची समस्या असू शकते. तुम्हाला हाडांशी संबंधित काही समस्या असू शकतात. आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःवर उपचार करा.

कन्या  (Virgo Today Horoscope)

 नोकरी (Job) -  नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.  मनाची कुचंबणा होईल. कामे यशस्वी होतील. कर्माला भाग्याची जोड मिळेल

व्यवसाय(Buisness)  -  व्यापार्‍यांसाठीही आजचा दिवस चांगला राहील.  . स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळू शकतो आणि त्यांच्या वस्तूंची विक्री वाढू शकते. विपरीत घटनेतून लाभ संभावतो

आरोग्य (Health) -  स्वत:च्या  प्रकृतीची काळजी घ्या. भावनिक वादळे निर्माण करु नका.  आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

तूळ  (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) -  आजचा  दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज  तुमचा दिवस थोडा तणावात जाईल. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळू शिकेल.

व्यवसाय (Buisness) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. यश खेचून आणाल.

आरोग्य (Health) -  मानसिक उदासीनता जाणवेल. भावनिक कटुता टाळा. चुकीचे औषध घेतल्याने त्रास संभावतो. कुटुंबातील व्यक्तींच्या तब्यतेची काळजी घ्या. मानसिकता उद्विगनता अनुभवाल

वृश्चिक  ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - महिना प्रगतीकारक राहील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. परदेशगमन घडेल. प्रलोभने टाळा. धंदा नोकरीत मोठ्या उलाढली होईल.

व्यवसाय (Buisness) - धंदा व्यवसायात अति धाडस करु नका. व्यवसायाच अस्थिरता निर्माण होईल. कामे यशस्वी होतील. अधिकार नीट चालणार नाहीत. स्पर्धकांचा अंदाज घ्या. 

आरोग्य (Health) - शारीरिक तक्रारी मोठे स्वरुप धारण करतील.  विलंब त्रास अडचणी अनुभवाल. पोटाची काळजी घ्या . जर तुम्ही शुगर किंवा हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमची औषधे नियमित घेत राहा आणि वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घ्या

धनु (Sagittarius Today Horoscope) 

नोकरी (Job) -   दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर  तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम लवकर पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

व्यवसाय (Buisness) -  आज कोणताही व्यवहार करताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज सावध राहून सर्व व्यवहार केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल आणि तुमचा व्यवसाय प्रगती करेल. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन काही प्रमाणात खुश होईल. जास्त  काळजी करू नका, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं.

मकर  (Capricorn Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची मीटिंग असेल तर त्यासाठी पूर्ण तयारी करून जा.

  व्यवसाय (Buisness) - रागापासून दूर राहावे, अन्यथा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या नुकसानीची चिंता असेल. तुमच्या व्यवसायात नेहमीच काही ना काही नफा-तोटा होत असतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

आरोग्य (Health) -  तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडा,

कुंभ (Aquarius Today Horoscope) 

नोकरी (Job) - जबाबदारीचे ओझे तुमच्या डोक्यावर पडू शकते. जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न कराल.तुम्ही तुमच्या विचारांना एक नवीन वळण देऊ शकता,  म्हणून तुम्ही कठोर परिश्रम करत राहा.  . नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगली बातमी मिळू शकते.

  व्यवसाय (Buisness)  - . आज कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू नका. फक्त आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाला काही चुकीचं बोलू नका, नाहीतर समोरच्याला तुमच्या बोलण्यामुळे वाईट वाटू शकतं. 

आरोग्य (Health) -  थोडीशी समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःचे उपचार करा, अन्यथा, तुमचा आजार गंभीर होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. काही अडचण असेल तर तुमच्या मोठ्यांशी जरूर चर्चा करा. 

मीन  (Pisces Today Horoscope) 

नोकरी (Job) -   तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील अधिकार्‍यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका, अन्यथा नंतर वाद आणखी वाढू शकतात. 

व्यवसाय (Buisness) - तुम्हाला नवीन व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही थोडा वेळ थांबावं, सध्या तुमच्यासाठी वेळ अनुकूल नाही. तुमचं मोठं नुकसानही होऊ शकतं. कोणत्याही प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही ज्या व्यवसायात आहात, त्या व्यवसायात काम करत राहा.

आरोग्य (Health) - आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुमची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब असेल तर आज तुमची प्रकृती सुधारू शकते. आजपासून तुम्हाला आराम मिळेल.  आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा बाळगू नये, अन्यथा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे  ही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAnjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करुAnil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Embed widget