एक्स्प्लोर

Sharad Pawar : मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका

Maratha Reservation : मराठा आरक्षण कोर्टात टिकेल असं वाटत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी सरकारने दिलेल्या आरक्षणावर चिंता व्यक्त केली आहे.

Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. असं असताना हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी शंका व्यक्त केली आहे. राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह

मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने मराठा आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात पुढे टिकलं नाही. पुन्हा तशाच्या पद्धतीने हे आरक्षण मंजूर करून घेतलं आहे. कायदेतज्ज्ञ बापट यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.

''मराठा आरक्षणाबाबत माझ्याही मनात शंका''

''कायदेशीर सल्लागार त्यांच्या मनात या आरक्षणाबाबत शंका आहे. माझ्याही मनात याबाबत शंका आहे. हा प्रश्न सुटला तर मला आनंद आहे. पण, जे विधेयक आता पास केलं. तसंच, एक विधेयक 2014 ला पास झालं होतं, ते हायकोर्टात फेल गेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधेयक मांडलं जे, उच्च न्यायालयात मंजूर झालं, पण सर्वोच्च न्यायालयात नामंजूर ठरलं. आता पुन्हा एकदा हेचं बिल सरकारने मंजूर केलं आहे. या निमित्ताने हा प्रश्न सुटत असेल, तर चांगलं आहे, यासाठी हे विधेयक सर्वांनी एकमताने मंजूर केलं'', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

हा सर्व ड्राफ्ट बघावा लागेल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बघावा लागेल, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्वांचा अभ्यास करुनच काही सांगता येईल, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

'आमदार सोडून जाणं, चिंता करण्यासारखी गोष्ट नाही'

आगामी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेला बारामतीबाबत आमच्या विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही. आमदार सोडून जाणं, हे मला चिंता करण्यासारखी गोष्ट वाटत नाही. ए आर अंतुले (A. R. Antulay) मुख्यमंत्री असताना असंच झालं होतं. मी परदेशात असताना 59 पैकी 5 सोडून सर्व आमदार सोडून गेले होते. पण, नंतरच्या निवडणुकीत 95 टक्के आमदार पराभूत झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की', असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?

व्हिडीओ

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Chandrapur Mayor 2026 Uddhav Thackeray: चंद्रपूरमध्ये राजकीय उलथापालथ, उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा, संदीप गिऱ्हेंसह 6 नगरसेवकांवर कारवाई होणार?
उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून नगरसेवकांचा भाजपला परस्पर पाठिंबा? संदीप गिऱ्हेंसह 6 नगरसेवकांवर कारवाई होणार?
Embed widget