Morning Headlines 17th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
धाकधूक वाढली! कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, वेगानं पसरणारा नवा व्हेरियंटही आढळला; अलर्ट मोडवर केरळ
Covid19 Sub Variant-Jn1 in Kerala: गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे. वाचा सविस्तर
PM मोदींच्या हस्ते आज 'सूरत डायमंड बोर्स'चं उद्घाटन; वाराणसीला 19,150 कोटींची भेट मिळणार
PM Narendra Modi To Inaugurate Surat Diamond Bourse Today : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सूरत (Surat) आणि वाराणसीच्या (Varanasi) दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता सूरत विमानतळावरील इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन करतील. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील. सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं बांधलेल्या इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना पीक अवर्सच्या वेळी 1200 डोमेस्टिक आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकाच वेळी हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच, या रचनेमुळे इमारतीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 55 लाखांपर्यंत वाढली आहे. वाचा सविस्तर
US President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का
Donald Trump vs Joe Biden, US President Election: अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला (US President Elections) आता एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक आहे. द हिलच्या अहवालानुसार, प्रमुख स्विंग राज्यांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून असं दिसून येतं की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. वाचा सविस्तर
17 December In History : राईट बंधूंनी पहिल्या 'द फ्लायर' नावाच्या विमानाचे यशस्वी उड्डाण केले, डॉ. श्रीराम लागू यांचे निधन; आज इतिहासात
मुंबई : 17 डिसेंबरचा दिवस इतिहासात दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनांसह नोंदवला गेला आहे. 17 डिसेंबर 1928 रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. याबरोबरच 2014 मध्ये 17 डिसेंबर रोजी अमेरिका आणि क्युबाने अनेक दशकांनंतर पुन्हा राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्याची घोषणा केली. वाचा सविस्तर
Horoscope Today 17 December 2023 : आजचा रविवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 17 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 17 डिसेंबर 2023 रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना आज चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. आज कन्या राशीच्या लोकांचे सामाजिक वर्तुळ वाढेल. तुम्ही तुमच्या समाजासाठी काही चांगले काम करू शकता. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर