एक्स्प्लोर

Morning Headlines 13th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालक ताब्यात, दुबईत बेड्या; रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस

Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात (Mahadev App) आता नवी अपडेट समोर आली आहे. बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुबईमधून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली गेली होती. वाचा सविस्तर 

केंद्रीय पथकाकडून आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा; दुष्काळाची करणार पाहणी

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ (Drought) पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांत हा पाहणी दौरा केला जाणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे (Pune) व सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), नंदूरबार (Nandurbar) व जळगावमध्ये (Jalgaon) हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत. वाचा सविस्तर 

Weather Update : पाऊस जाता जाईना! पुढील 48 तासात पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह उत्तर भारतात गारठा वाढला

Weather Update Today : देशात बहुतेक राज्यांमध्ये तापमानात घट (Temperature Drops) झाल्याचं दिसून येत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा (Cyclone) प्रभाव कमी झाला असला तरी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आजही पावसाची शक्यता आहे. देशात 13 ते 16 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज (Rain Updates) वर्तवण्यात आला आहे. ईशान्य भारत (Northeast India) आणि दक्षिण भारतात (South India) पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. तामिळनाडू (Tamil Nadu), आसामसह (Assam) काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवला आहे. वाचा सविस्तर 

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?

Nikki Haley vs Joe Biden, US President Election: आगामी काळात देशात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही (America) आतापासूनच निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेत पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांबाबत (US President Election) राजकीय वर्तुळात (World Political Updates) चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे अनेक चेहरे सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती, निक्की हेली यांची. भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) या रिपब्लिकन पक्षाकडून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. वाचा सविस्तर 

SGB Scheme : इथे स्वस्त सोने मिळेल, खरेदीसाठी पैसे तयार ठेवा; ऑफर फक्त 5 दिवसांसाठी

SGB Scheme 2023-24 : सोने खरेदी करण्याच्या किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोनं खरेदी करू शकता आणि तेही थेट सरकारकडून. हो, तुम्ही वाचताय ते खरं आहे. स्वस्तात सोने खरेदीचा उत्तम उपाय म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँड. तुम्ही सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवून स्वस्तातो सोने खरेदी करुन नफाही कमावू शकता. डिसेंबर महिन्यात सॉव्हरिन गोल्ड बाँडचा तिसरा हप्ता जारी होणार आहे आणि यामध्ये तुम्ही स्वस्तात सोनं विकत घेऊन सरकारी योजनेद्वारे सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकाल. स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी फक्त पाच दिवसांसाठी मिळेल. त्यामुळे ही सुवर्णसंधी दवडू नका. वाचा सविस्तर 

IND vs SA 2nd T20I Score: सूर्यकुमार, रिंकू सिंहवर भारी पडलं रिजा हेंड्रिक्सचं वादळ; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव

India vs South Africa, IND vs SA 2nd T20I Score: दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) सुरुवात खराब झाली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना संघाने 5 विकेटने गमावला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. वाचा सविस्तर 

13th December In History : संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस, अभिनेत्री स्मिता पाटीलचा स्मृतीदिन; आज इतिहासात...

13th December In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात घडलेल्या काही घटनांचे पडसाद भविष्यावरही दिसून येते. इतिहासातील काही घटना या दु:खद घटना म्हणूनही कायम कोरल्या जातात.13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. आजच्या दिवशी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा बिमोड करताना काही सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि रुपेरी पडद्यावरील सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज जन्मदिन... वाचा सविस्तर 

Horoscope Today 13 December 2023 : आजचा बुधवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 13 डिसेंबर 2023, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज समाजात मान-सन्मान मिळू शकतो. आज कन्या राशीच्या लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget