एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

13th December In History : संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस, अभिनेत्री स्मिता पाटीलचा स्मृतीदिन; आज इतिहासात...

13th December In History : आजच्या दिवशी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा बिमोड करताना काही सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि रुपेरी पडद्यावरील सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन.

13th December In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात घडलेल्या काही घटनांचे पडसाद भविष्यावरही दिसून येते. इतिहासातील काही घटना या दु:खद घटना म्हणूनही कायम कोरल्या जातात.13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. आजच्या दिवशी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा बिमोड करताना काही सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि रुपेरी पडद्यावरील सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज जन्मदिन. 

1955 : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म

भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवगंत मनोहर पर्रिकर यांचा जन्मदिन. गोव्यात जन्म झालेले मनोहर पर्रिकर यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी मिळवली. आयआयटीची पदवी असणारे ते देशातील पहिले आमदार होते. पर्रिकर हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. त्यानंतर त्यांनी भाजपात काम करण्यास सुरुवात केली. 

वर्ष  2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं.  2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली. गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 17 मार्च 2019 रोजी त्यांचं निधन झालं.

1986: अभिनेत्री स्मिता पाटीलचं निधन (Smita Patil Death Anniversary)

सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या या स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन.  स्मिता पाटील हिचा जन्म पुण्यात झाला. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारक होत्या. स्मिताने तिच्या रुपेरी पडद्यावरील करियरमध्ये अनेक समांतर चित्रपटांत काम केले. अनेक चित्रपटांमध्ये तिने कणखर स्त्रीची भूमिका साकारली. यामागे तिच्या आईचा प्रभाव असल्याचं सांगितलं जाते. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. 

स्मिता पाटील ही दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका होती. त्यानंतर तिने चित्रपट, रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. भारतीय सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव अग्रक्रमी आहे. स्मिताने तिच्या जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत 80 हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. 

स्मिताने श्याम बेनेगल यांच्या श्याम बेनेगल यांच्याचरणदास चोर (1975) चित्रपटातून पदार्पण केले होते. स्मिता पाटील ही समांतर चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपास आली. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ,  मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली. 

चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

स्मिता पाटीलचा विवाह अभिनेता राज बब्बरशी झाला होता. 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. 

अभिनयाव्यतिरिक्त स्मिता ही सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राची सदस्या होती. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी ती मनापासून वचनबद्ध होती आणि पारंपारिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून तिने काम केले.

1994 : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचं निधन

सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी असलेल्या विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचं निधन आजच्या दिवशी झालं होतं. 

2001 :  भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला, 

जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाच्या पाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली. 

13 डिसेंबर 2001 रोजी, गृह मंत्रालय आणि संसदेचे लेबल असलेल्या कारमधून पाच अतिरेक्यांनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला. या हल्ल्याच्या आधी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यावेळी संसदेत अनेक खासदारांसह गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी आणि इतर मंत्री अधिकारी संसदेच्या इमारतीमध्ये होते. प्रमुख राजकारण्यांसह 100 हून अधिक लोक त्यावेळी संसद भवनात होते. बंदूकधार्‍यांनी कारवर बनावट ओळख स्टिकर वापरला आणि अशा प्रकारे संसद भवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था भंग केली. 

दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार सुरू केला. त्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दिल्ली पोलीस कर्मचारी, संसद सुरक्षा कर्मचारी आणि संसद भवन परिसरातील माळी इतर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

हल्ल्यानंतर अनेक संशयितांना अटक करण्यात आली आणि डिसेंबर 2002 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या चार सदस्यांना हल्ल्यातील भूमिकांसाठी दोषी ठरवण्यात आले. 2003 मध्ये, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने जैश-ए-मोहम्मदचा कमांडर-इन-चीफ आणि हल्ल्याचा मास्टरमाईंड, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरच्या नूर बाग शेजारील गाझी बाबा याला ठार केले.

इतर महत्त्वाच्या घडामोडी :

1930 : प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
2002: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर
2016: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget