एक्स्प्लोर

मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ

विशेष म्हणजे विरोधक नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर मोदीवर सरकारवर सातत्याने टीका करत असताना, मूडीजने आता त्याचंच कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. या निर्णयांचा विरोध होत असला तरी, जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत. अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे. मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग एका अंकाने वाढवलं आहे. आतापर्यंत भारताचा समावेश BAA-3 या श्रेणीत होता, आता तो BAA-2 श्रेणीत करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भारताची पत वाढली आहे. विशेष म्हणजे विरोधक नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर मोदीवर सरकारवर सातत्याने टीका करत असताना, मूडीजने आता त्याचंच कौतुक केलं आहे. 13 वर्षांनंतर रेटिंगमध्ये सुधारणा आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून 'Baa3' केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं. BAA3 चा अर्थ काय? BAA3 रेटिंगचा अर्थ म्हणजे सर्वात कमी गुंतवणुकीची स्थिती असणं. म्हणजेच आता मूडीजनुसार भारतात गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं आहे. यामुळे रेटिंग BAA3 ने वाढवून  BAA2 केलं आहे. 'मूडीज'च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात मोठी उसळी मूडीजने काय म्हटलं? एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे. विकासदर वाढणार मोदी सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम काही काळाने दिसेल. उदाहरणार्थ, जीएसटी आणि नोटबंदीमुळे काही काळ विकासदरात घसरण झाली होती, असं मूडीजने म्हटलं आहे. पण मार्च 2018 पर्यंत भारताचा विकासदर 6.7 टक्के होईल. तर 2019 पर्यंत विकासदर पुन्हा एकदा 7.5 टक्क्यांवर पोहोचेल, असं अंदाज मूडीजने वर्तवला आहे. मूडीजचं नेमकं काम काय ? मूडीज इन्वेस्टर सर्विसेस ही संस्था मूडीज् म्हणूनच ओळखळी जाते. ही संस्था जगातील विविध अर्थव्यवस्थांवर आणि त्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यानुसार प्रत्येक अर्थव्यवस्थेचं मानांकन करते. मूडीजने दिलेलं मानांकन अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह मानलं जातं. अमित शाहांकडून कौतुक मूडीजचं रेटिंग आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि सरकारच्या कामांमुळे सातत्याने विकास होत आहे. याआधी भारताने वर्ल्ड बँकेच्या ईज ऑफ डुईंगच्या रेटिंगमध्येही सुधारणा केली होती. https://twitter.com/AmitShah/status/931360087377088512
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget