एक्स्प्लोर
नोटाबंदी : सरकारच्या नवीन निर्णयानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
नवी दिल्ली : आजपासून जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत. या नोटा बँकेत तुमच्या खात्यात भरुन तुम्ही एटीएम, बँक स्लीप किंवा चेकद्वारे काढू शकाल. केंद्र सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही
या निर्णयानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्व सामान्यांना पडणाऱ्य काही प्रश्नांची उत्तर : प्रश्न : आता पाचशे, हजारच्या जुन्या नोटा बदलून मिळणार का? उ : नाही, आता बँक, पोस्ट ऑफिस या ठिकाणी नोटा बदलून मिळणार नाहीत. बँकेत हजारच्या नोटा फक्त जमा करता येतील. त्यानतंर एटीएमद्वारे पैसे काढता येतील. प्रश्न : ज्या ठिकाणी आतापर्यंत जुन्या नोटा चालत होत्या, त्या ठिकाणी सध्या चालतील का? उ : महत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा आता 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ दिली आहे. पण आता फक्त 500 च्या नोटा स्वीकारल्या जातील.या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार
प्रश्न : हजारची नोट आता कुठेच चालणार नाही का? उ : नाही, सरकारने आतापर्यंत जुन्या नोटा वापरण्याची मुभा दिली होती. त्या ठिकाणी देखील हजारची नोट चालणार नाही. प्रश्न : सरकारने जुन्या पाचशेच्या नोटा वारण्यास आणखी कुठे-कुठे परवानगी दिली आहे? उ : सरकारी शाळा, महाविद्यालयांची 2 हजार रुपयांपर्यंतची फी 500 च्या नोटांमध्ये भरु शकता. शिवाय प्री पेड मोबाईल ग्राहक रिचार्जसाठी 500 ची नोट वापरु शकतात. प्रश्न : सरकारने कोणते नवीन बदल केले आहेत? उ : ग्राहक को-ऑपरेटिव्ह दुकांनांमध्ये एका वेळी 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.नाशिकमधून 2 कोटी 45 लाख नोटांचं हवाई उड्डाण
प्रश्न : परदेशी नागरिकसुद्धा नोटा बदलू शकणार नाहीत का? उ : परदेशी नागरिक एका आठवड्याला पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम बदलून घेऊ शकतात. याची पासपोर्टमध्ये नोंद होईल. प्रश्न : टोलवर आता पैसे द्यावे लागणार का? उ : राष्ट्रीय महामार्गावर आता 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे. मात्र 3 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा टोलवर स्वीकारल्या जातील. अनेक टोलवर स्वाईप मशिनची सुविधा देखील देण्यात येणार आहे. यामुळे क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करुन पैसे देता येतील.1000 ची नोट थेट बँकेतच जमा करा, 500च्या नोटा फक्त इथं स्वीकारणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement