![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Medicine : रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या
Medicine : ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झालीय तर अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
![Medicine : रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या Medicine Price Hike Patients will hit by inflation with drug prices rising by 40 per cent Medicine : रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/d027c4ab2229b0bb7f38f6ead026c2eb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : इंधन दरवाढीनं सगळ्याच वस्तू महाग झाल्या आहेत आणि त्याला औषधंही अपवाद नाहीत. ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झालीय. यासोबतच प्रतिजैविक औषधं तसंच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यानं रुग्णांना त्याचा फटका बसतोय.
कोरोना व्हायरसमुळे औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यात. ज्याला औषधी क्षेत्रात सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API म्हणतात त्याच्या किंमतीत वाढ झाल्याने औषधे महागली आहेत. ही औषधांची महागाई इतक्यात अटोक्यात येण्याची चिन्ह नाहीत. लोक आर्धीच औषधे विकत घेत आहेत.
कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या
कोरोनामुळे औषध निर्मितीसाठी अत्यावश्यक असलेल्या कच्चा मालाच्या पुरवठा साखळी अडचणीत आली. अत्यावश्यक औषधांच्या कच्च्या मालाच्या किंमतीत सरासरी 50 टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. काही घटकांची वाढ 140 टक्क्यांपर्यंत पर्यंत गेली आहे. गेल्या वीस वर्षात औषधांच्या किंमतीत इतकी भरमसाठ वाढ कधी झाली नसल्याचं औषध विक्रेत्यांनी सांगितलं आहे.
औषधं निर्मितीसाठी लागणाऱ्या सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API ची भारत जवळपास 70 टक्के कच्चा माल चीनमधून आयात करतो. आपला देश लोकसंख्येमुळे मधुमेह आणि रक्तदाबाची जागतिक राजधानी झाला आहे. त्यामुळे या औषधांचीा मागणी जास्त आहे.
कोणत्या गोळ्या किती रुपयांना मिळणार?
रक्तदाबाची गोळी पूर्वी दहा गोळ्यांची एक स्ट्र्पीची किंमत 172 रूपये होती. ती आता 190 झाली आहे. मधुमेहाची एक स्ट्रीप 11 रुपये 30 पैशाला होती. ती आता 18 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. अँटासिडच्या 15 गोळ्यांची किंमत पूर्वी 24 रुपये होती ती आता 37 रुपये झाली आहे. झंडूबाम 35 रुपये होता, तो 40 रुपयांना मिळणार आहे. विक्स इनहेलर आधी 50 रुपयांचं होतं, ते आता 59 रुपयांना मिळणार आहे.
खोकल्याच्या एका बॅाटलची किंमत सहा महिन्यात 40 ते 50रूपयांनी वाढली आहे. डेटॅालची 105 रुपयांची बॅाटल आता 116 रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांच्या किंमती 99 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेल्या आहेत. त्वचा रोगावर चालणारे औषध 37 रुपयांसाठी होते, ते आता 46 रुपयांना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)