एक्स्प्लोर

DRDO COVID-19 Drug 2-DG: डिआरडीओने विकसित केलेल्या औषधाची निर्मिती आणि बाजारपेठेत आणण्यास मॅनकाइंड फार्माला परवानगी

डिआरडीओने विकसित केलेल्या औषधाची निर्मिती आणि बाजारपेठेत आणण्यास मॅनकाइंड फार्माला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच औषध सर्वांना उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने कोविड -19 च्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG) ची निर्मिती आणि विक्री करण्यासाठी मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) या औषध कंपनीला परवाना दिला आहे. मॅनकाइंड फार्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 2-डीजी हे औषध ग्वाल्हेर येथील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंटने (DRDE) विकसित केले आहेत. 2-डीजी औषधाच्या क्लिनिकल चाचण्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) संस्थेने डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या आहेत.

आपत्कालीन वापरास मान्यता 
डीआरडीओने विकसित केलेलं हे औषध 17 मे 2021 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आलं आहे. डीसीजीआयने डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. डीआरडीओने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे औषध तयार केले आहे.

DRDO ने  हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीजच्या लॅबमध्ये 10 हजार डोस तयार केले आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरुवात करणार होतं. पाण्यात विरघळली जाणारी ही औषधे लवकरच इतर रुग्णालयातही उपलब्ध होऊ शकतात.

औषध पावडर स्वरुपात मिळणार
DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये  मिळते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते. जेव्हा देशभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असते आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते अशा वेळी हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. असा दावा केला जात आहे. या औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही.

ऑक्सिजनची कमी गरज
क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, या औषधाचे सेवन केल्यानंतर कोरोनाबाधित  रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ghaywal : योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : घायवळ प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप, Kadam, Pawar, Shinde रडारवर
Zero Hour : Chandrakant Patil यांच्यावर Dhangekar यांचे गंभीर आरोप
Zero Hour : Shiv Sena-BJP मध्ये आरोप प्रत्यारो, Ramdas Kadam यांचे Ram Shinde कडे बोट
Zero Hour : रोहित पवार, सुनंदा पवार आणि Sachin Ghaywal यांच्या VIDEO वरून BJP चा पलटवार!
Zero Hour : Rohit Pawar यांच्या आरोपांमागे Karjat Jamkhed राजकारण? व्हिडीओ वॉर सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ghaywal : योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये काही तासात येणार, उद्यापासून वितरण सुरु,s आदिती तटकरेंची मोठी घोषणा 
गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये काही तासात येणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा 
निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरीतून कोथरुडमध्ये जमवली माया, कुटुंबीय फरार
निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरीतून कोथरुडमध्ये जमवली माया, कुटुंबीय फरार
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीवर दडफेक, 8 दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीच पत्र; सांगली जिल्ह्यात खळबळ
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीवर दडफेक, 8 दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीच पत्र; सांगली जिल्ह्यात खळबळ
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
Embed widget