आता ATM मधून मिळणार औषधं; देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये सुविधा मिळणार
देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरच्या (Common Service Centre) अयूर संजिवनी केंद्रावर औषधांची ATM बसवण्यात येणार आहेत. याचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांना होणार आहे.
![आता ATM मधून मिळणार औषधं; देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये सुविधा मिळणार Medicine ATM news medicines to available at ATMs soon The facility will be available in 6000 blocks across the country आता ATM मधून मिळणार औषधं; देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये सुविधा मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/18/0bf6b6bb546761095772a0c9cbcc34a3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बँका जरी बंद असल्या तरी आपण एटीएमच्या माध्यमातून कुठेही आणि कधीही पैसे काढू शकतो. याच प्रकारची व्यवस्था आता औषधांच्या बाबतीतही सुरु होणार असून आता एटीएममधून औषधं मिळणार आहेत. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचं हे मशीन बसवण्यात येणार असून त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधं उपलब्ध होणार आहेत.
देशामधल्या एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असं औषधांचं मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे.
केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मार्फत या आधीपासूनच ब्लॉक स्तरावर अयूर संजिवनी केंद्र सुरु आहेत. या केंद्रावर आता ही औषधांची एटीएम बसवण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधं आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि इतर प्रकारची औषधं या एटीएममधून मिळणार आहेत. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ब्लॉक स्तरावर बसवण्यात येणाऱ्या या एटीएममधून शक्यतो जेनेरिक औषधं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आता पैशाप्रमाणे औषधंही 24 तास उपलब्ध होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)