एक्स्प्लोर
खुशखबर, मान्सून अंदमानात डेरेदाखल !
पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला अखेर मेघराजाने दिलासा दिला आहे. कारण मान्सून अंदमान-निकोबार बेटावर डेरेदाखल झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून सरी बरसल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
तामिळनाडू, केरळसह दक्षिणेकडील अनेक राज्यात कालच मान्सूनपूर्व पाऊस कोसळला होता. त्यानंतर आज मान्सूनच दाखल झाल्याचा दावा पुणे वेधशाळेने केला आहे.
चार दिवसांपूर्वीच पुणे वेधशाळेने येत्या 3-4 दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आज मान्सून दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असेलला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला आहे. त्यामुळे 16 ते 17 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती.
देशासह महाराष्ट्रात जनता दुष्काळ आणि उकाड्याने हैराण झाली आहे. बळीराजा पावसाकडे अक्षरश: डोळे लावून बसला आहे. त्यामुळे अंदमानात दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राकडे कधी आगेकूच करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात
यंदा चांगला पाऊस, भेंडवळमधील भविष्यवाणीतून बळीराजाला...
पुढील 5 दिवसांत राज्यात पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज
बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement