एक्स्प्लोर

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार

नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर काश्मिरी तरुणाला बांधणारे मेजर लितुल गोगोई यांचा भारतीय सैन्यातर्फे सत्कार करण्यात आला. सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी 'निष्पाप' काश्मिरी तरुणाला गाडीवर बांधणाऱ्या मेजर गोगोईंवर टीकेची झोड उठली होती. जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी नामी उपाय शोधला होता. जवानांच्या गाड्यांना 400 काश्मिरी तरुणांनी घेरलं होतं. या परिस्थितीत दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी एका काश्मिरी तरुणालाच जीपवर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असा युक्तिवाद व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर येत होता. मात्र खुद्द लष्कराकडूनच त्यांचा गौरव केल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांबद्दल मेजर लितुल गोगोई यांना लष्करप्रमुखांनी प्रशस्तिपत्रक देऊन गौरवल्याची माहिती आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या काश्मिर दौऱ्याच्या वेळी त्यांचा सत्कार झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. मेजर गोगोई यांच्यावर राजकीय नेत्यांनी टीकेचा भडिमार केला होता. जम्मू काश्मीर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आर्मीनेही त्यांची न्यायालयीन चौकशी (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) केली होती. अशा प्रकारे हिंस्र कृत्य करुन गोगोई यांनी मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं जात होतं. भारतीय सैन्याच्या नियमावली विरोधात हे कृत्य असल्याचं मानलं जात होतं. एकही गोळी न चालवता आम्ही शेकडो जणांचे प्राण वाचवले, असं गोगोई यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मी काहीच गैर केलेलं नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. मी घाबरलो नव्हतो. दगडफेक करणाऱ्यांनी सर्व बाजुंनी घेरलं, मात्र पोटनिवडणुका सुरळीत पार पडण्याकडे आमचं लक्ष होतं, असं लितुल गोगोई म्हणाले. काय आहे प्रकरण? 9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं. विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नव्हते. याचं कारण म्हणजे शत्रूच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे. बातमीचा व्हिडीओ - संबंधित बातम्या : VIDEO : दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं! जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली

श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget