एक्स्प्लोर
सप्टेंबरपर्यंत वाळू साठ्यांवर सॅटेलाईटची नजर, जावडेकरांचं व्हिजन

नवी दिल्ली: वाळू माफियांवर कायमचा आवर घालण्यासाठी वाळू साठ्यांवर सप्टेंबरपर्यंत सॅटेलाईटद्वारे वॉच ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेंकरांनी दिली. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या काळात 33 टक्के राष्ट्रीय वनीकरणाचं लक्ष समोर ठेऊन केंद्र सरकार काम करत आहे, तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आम्ही विकास साधणार असल्याचा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला. तसंच पर्यावरण आणि विकास हे एकाचवेळी शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं. गेल्या दोन वर्षा जंगल क्षेत्रात वाढ झाली. पर्यावरणाला बाधा न येता अनेक विकास कामांना परवानगी दिली, असं जावडेकर यांनी सांगितलं. मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मराठी मंत्र्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमातून मांडण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं व्हिजन मांडून या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर जावडेकर, अनंत गिते आणि सुरेश प्रभू हे आपलं व्हिजन मांडतील.
संबंधित बातम्या
वेगळा विदर्भ नव्हे, पाणी प्रश्न महत्त्वाचा : गडकरींचं व्हिजन
आणखी वाचा























