एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5.0 मध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळणार परवानगी
केंद्र सरकारने देशात पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक-1' लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आठ जूनपासून धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहेत.
नवी दिल्ली : देशात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या लॉकडाऊनची मर्यादा 1 जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा लॉकडाऊन केवळ कंटेनमेंट झोनपुरताचं असणार आहे. अन्य ठिकाणी हळूहळू निर्बंध उठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. अटीशर्थींसह धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू लागू होणार आहे. तर, या लॉकडाऊनचे "अनलॉक-1" असे नाव नामकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन फेजमध्ये असणार आहे. प्रत्येक फेजमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.
Lockdown 5.0 | देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, ल़ॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित
नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यू लावला जाणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र, अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाली 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती.
- फेज : 1 मध्ये 8 जूनपासून धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहे. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालया जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.
- संपूर्ण देशात 30 जूनपर्यंत नाइट कर्फ्यू लागू असणार
- फेज -2 मध्ये शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग, यांचा जुलै महिन्यात राज्य आणि केंद्राच्या परवानगीनंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियमावलीही जारी करण्यात येणार आहे.
- या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे.
- फेज - 3 मध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो, चित्रपटगृह, स्वीमींग पुल, सार्वजनिक कार्यक्रमाचे हॉल, व्यायाम शाळा, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार तसेच सार्वजनिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजनपर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
- आंतरराज्यीय वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, एखादं राज्य अशा वाहतुकीस परवानगी नाकारू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement