(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LCH Helicopter: भारताचं हवाई सामर्थ्य वाढलं; 'प्रचंड' LCH हेलिकॉप्टर वायुदलात दाखल
Light Combat Helicopter : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नवीन स्वदेशी 'मेड इन इंडिया' लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH - Light Combat Helicopter) 'प्रचंड' (Prachand) दाखल झालं आहे.
Light Combat Helicopter : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नवीन स्वदेशी 'मेड इन इंडिया'(Made in India) लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH - Light Combat Helicopter) दाखल झालं आहे. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढली आहे. या स्वदेशी हेलिकॉप्टरसह भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात नवीन सोनेरी पान जोडलं गेलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. एलसीएच हेलिकॉप्टर 'प्रचंड' (LCH Prachand) वायूदलाच्या ताफ्यात सामील झालं आहे. जोधपुर एयरबेसवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'प्रचंड' (HAL Prachand) हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं.
आज सैन्य दलात लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH - Light Combat Helicopter) ची पहिली बॅच दाखल होणार आहे. या अंतर्गत एकूण 10 LCH हेलिकॉप्टर सैन्य दलात सामील करण्यात येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पहिलं स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 'प्रचंड' (LCH Prachand) हवाई दलात दाखल झालं आहे. या हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये (Attack Helicopter) शत्रूवर अचूक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर बाबत खास गोष्टी (Key Features of LCH Helicopter)
- LCH हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीने तयार केलेलं हेलिकॉप्टर आहे.
- यामध्ये 5.8-टन दुहेरी इंजिन आहे. या इंजिनामध्ये Safran या फ्रेंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आधुनिक तंत्रज्ञान आणि इंजिनसह सुसज्ज आहे.
- यामध्ये 20 मिमी बंदुक, 70 मिमी रॉकेट प्रणाली आणि हवेतून क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुसज्ज यंत्रणा आहे.
- कमी वजनामुळे हे हेलिकॉप्टर इतर हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरपेक्षा (Attack Helicopter) जलद आहे.
- उंच भागात उड्डाण आणि लँडीग करण्याची क्षमता
- सर्व प्रकारच्या हवामानात लढाण्याची क्षमता
- आधुनिक संरक्षण प्रणाली, अंधारात हल्ला करण्याची क्षमता आणि चांगल्या जगण्यासाठी क्रॅश-योग्य लँडिंग गियर आहेत.
पहिलं LCH हेलिकॉप्टर जोधपूर जवळील सीमा भागात तैनात
आजपासून हे हेलिकॉप्टर जोधपूर सीमेजवळ तैनात असेल. LCH हेलिकॉप्टर 'धनुष' या 143 हेलिकॉप्टर युनिटमध्ये सामील करण्यात आलं आहे. LCH हेलिकॉप्टर भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान या भारताला हल्ला करण्यासाठीच्या म्हणजे हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरची (Attack Helicopter) गरज भासू लागली होती. त्यानंतर LCH हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आखण्यात आली.
लष्कराकडून येत्या काळात आणखी हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येतील. शत्रूवर भेदक मारा करणारे हलक्या वजनाचे LCH हेलिकॉप्टर पर्वतरांगांमध्ये सात युनिटमध्ये तैनात केले जातील. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) मध्ये दोन लोक बसू शकतात. या हेलिकॉप्टरची लांबी 51.10 फूट आणि उंची 15.5 फूट आहे. याचे वजन 5800 किलो आहे. हे हेलिकॉप्टर 268 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या