एक्स्प्लोर

LCH In Airforce : भारताचा नवा 'योद्धा', हवाई दलात दाखल होणार पहिलं स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

Indian Air Force LCH : भारतीय हवाई दलात नवीन योद्धा सामील होणार आहे. पहिलं स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सैन्य दलात दाखल होणार आहे.

Indian Air Force Gate New LCH : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नवीन योद्धा सामील होणार आहे. पहिलं स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सैन्य दलात दाखल होणार आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय हवाई दलात स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH-HAL Light Combat Helicopter) आज सामील होणार आहेत. जोधपूरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही स्वदेशी LCH जोधपूर सीमेजवळ तैनात करण्यात येतील. 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत भारत स्वदेशीवर भर देत आहे. त्या दृष्टीने ह महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय संरक्षण दलात आज 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) दाखल होणार आहेत. यातील पाच हेलिकॉप्टर सैन्य दलात आणि पाच हवाई दलात सेवेत असतील.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, 'स्वदेशी बनावटीचं पहिलं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हवाई दलात सामील होणार आहे. यासाठी मी 3 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे उपस्थित असेन. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.'

स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) ची वैशिष्ट्ये

  • लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (Light Combat Helicopter) म्हणजेच (LCH) हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 6 टन आहे. भारताने अमेरिकेकडून खरेदी केलेल्या अपाचे हेलिकॉप्टरचे (Boeing AH-64 Apache) वजन सुमारे 10 टन आहे. त्यामुळे LCH हेलिकॉप्टर हे अपाचे हेलिकॉप्टरपेक्षा वजनानं हलकं आहे.
  • कमी वजनामुळे LCH हेलिकॉप्टर आपल्या क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेकऑफ आणि लँडिंग करू शकते.
  • LCH हे अटॅक हेलिकॉप्टरमधील 'मिस्ट्रल' हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खास फ्रान्समधून आणलं आहे.
  • एलसीएचमध्ये प्रत्येकी 70 मिमीच्या 12-12 रॉकेटचे दोन पॉड आहेत.
  • LCH हेलिकॉप्टरमध्ये पुढच्या बाजूला 20 मिमीची बंदूक बसवण्यात आली आहे, जी 110 अंशात कोणत्याही दिशेने हल्ला करु शकते.
  • कॉकपिटची सर्व फिचर्स पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले केले जातील.
  • कारगिल युद्धानंतर भारताने स्वदेशी एलसीएच हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यावेळी भारताकडे असे अटॅक हेलिकॉप्टर नव्हते जे 15-16 हजार फूट उंचीवर जाऊन शत्रूचे बंकर्स नष्ट करू शकतील. 
  • 2006मध्ये सरकारने LCH हेलिकॉप्टर बनवण्याची परवानगी दिली.
  • गेल्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहे.

Apache हेलिकॉप्टर आणि LCH हेलिकॉप्टरमध्ये काय फरक आहे?

भारताने नुकतेच अमेरिकेकडून अपाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी केले असेल, परंतु अपाचेला कारगिल आणि सियाचीनच्या टेकड्यांवर टेक ऑफ आणि लँडिंगमध्येही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याचं कारण अपाची वजनाने जड आहे. मात्र, त्याच्या तुलनेने LCH हेलिकॉप्टर अत्यंत हलके असल्यामुळे LCH उंच भागात शत्रूंवर हल्ला करु शकते.

विशेष काय आहे?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL - Hindustan Aeronautics Limited) कंपनीकडून LCH हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मते, LCH हेलिकॉप्टरमध्ये असलेले फिचर्स शत्रूच्या रडारमध्ये सहज पकडले जाणार नाहीत. जर शत्रूच्या हेलिकॉप्टर किंवा फायटर जेटने त्याचं क्षेपणास्त्र एलसीएचवर डागलं तर LCH क्षेपणास्त्राचा मारा चुकवू शकते. LCH हेलिकॉप्टरवर शत्रूच्या गोळीबाराचा कोणताही परिणाम होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीतीAmol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget