एक्स्प्लोर

LCA Tejas Aircraft : अभिमानास्पद! वीस हजार फूट उंचीवरून उडणाऱ्या तेजस विमानातून 'ASTRA'ची यशस्वी चाचणी

LCA Tejas Aircraft : तेजसने गोव्याच्या किनार्‍यावर ‘अॅस्ट्रा’ या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून एक मोठा पराक्रम गाजवला.

LCA Tejas Aircraft : भारतीय बनावटीच्या आणि नजरेपलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुमारे 20,000 फूट उंचीवरून या क्षेपणास्त्राची विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची ​​चाचणी 23 ऑगस्ट रोजी  गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात ही चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने भारतील हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.

ASTRA क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी 

क्षेपणास्त्र विमानातून सुमारे 20,000 फूट उंचीवरून लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची ​​चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर 'ASTRA' या क्षेपणास्त्राच्या पलीकडे व्हिज्युअल रेंजच्या हवेतून हवेत मारा करण्यात आली. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), डीआरडीओ (DRDO) आणि इतर विभागांशी समन्वय साधून एचएएलने हे यश मिळविले आहे.  या यशस्वी चाचणीमुळे ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेलाही बळ मिळाले आहे.  या विमानाचे परीक्षण दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानाने केले.  

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे काय?

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (beyond-visual-range missile - BVR) म्हणजे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा प्रकार आहे. ही क्षेपणास्त्रे साधारणपणे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडील म्हणजे 20 नॉटिकल मैल (nmi) किंवा किलोमीटरच्या भाषेत 37 किलोमीटर अंतराच्या पलीकडील लक्ष्य भेदण्यात सक्षम असतात. या प्रकारातील क्षेपणास्त्रांमध्ये असलेल्या ड्युअल पल्स रॉकेट मोटर (dual pulse rocket motors) किंवा बूस्टर रॉकेट मोटरच्या साहाय्याने त्यांना एवढ्या दूरवरील अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम केलं जातं. 

अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेसोबतच या बीव्हीआर क्षेपणास्त्रे त्यांच्यासाठी आधीच निश्चित केलेलं लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सक्षम असतात. तसंच या क्षेपणास्त्रांमध्ये अतिशय दूर अंतरावरील लक्ष्य विमानातून  निश्चित करण्याची यंत्रणाही कार्यान्वित आहे. तसंच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या लक्ष्याने आपलं स्थान बदललं तरीही ही क्षेपणास्त्रे बदललेल्या स्थानावरील लक्ष्याचा (mid-course correction) वेध घेण्यात सक्षम आहेत.

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र असून ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून  नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.  स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून प्रक्षेपण हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Vistara Airlines : एकाच वेळी रनवेवर समोरासमोर आली दोन विमानं, महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले 500 प्रवाशांचे प्राण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget