एक्स्प्लोर

Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या, मुद्दा सोडवण्यासाठी आपण सक्षम

अनेक सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचं स्वागत करत ट्वीट केलं आहे. आता भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

Lata Mangeshkar on Farmers Protest : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत.  गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलीफासारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर, कंगना रनौत, अक्षय कुमार, अजय देवगण, एकता कपूर, विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचं स्वागत करत ट्वीट केलं आहे. आता गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळं गौरवान्वित आहोत. त्यांनी म्हटलंय की, एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'इंडिया टूगेदर' आणि 'इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा' असे हॅशटॅगही दिले आहेत.

Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही - सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.

कोणताही प्रोपागंडा देशातील ऐक्याला बाधा पोहचवू शकत नाही, गृहमंत्री अमित शाह यांचा परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर पलटवार

भारताविरूद्ध प्रचाराचा भाग होऊ नका : अजय देवगन बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली विरोध करणार्‍यांना इशारा देत आपण कोणत्याही प्रचाराचा भाग घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, की "भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे. "

Rihanna Farmer Protest Comment: परराष्ट्र मंत्रालयाकडून रिहाना, ग्रेटा यांना सल्ला, तर अक्षय कुमार म्हणतो..

अर्थवट सत्य धोकादायक : सुनील शेट्टी अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की- "आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहिले पाहिजे. कारण, अर्धसत्य धोकादायक असते. तर करण जोहरने लिहिले आहे की आपण कठीण काळात जगत आहोत आणि प्रत्येक वळणावर धीर धरला पाहिजे ही काळाची गरज आहे. एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शेतकरी हा भारताचा कणा असून यात कुणालाही फूट पाडू देऊ नका.

सामंजस्य ठरावाचे समर्थन करा -अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारने आज ट्विटरवर लिहलंय की, "शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget