एक्स्प्लोर

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राची पुन्हा तुरुंगात रवानगी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आला शरण 

उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Case) हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आशिष मिश्रा आज न्यायालयात शरण आला.  

Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृह राज्यमंत्री  अजय मिश्रा यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी  हिंसाचारातील (Lakhimpur Kheri Violence) मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याने अखेर न्यायालयात शरणागती पत्करली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राचा जामीन फेटाळला होता. तसेच, त्याला आठवडाभरात न्यायालयाला शरण येण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आशिष मिश्रा याने आज दंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.

आशिष मिश्राचा याचा सोमवारी जामीन रद्द करण्यात आला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वीच आज आशिष मिश्रा याने न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   

उत्तर प्रदेशधील लखीमपूर खेरी येथील शेतकर्‍यांना चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आणि जामिनाला विरोध केला. मात्र, चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी आशिष मिश्राला उच्च न्यायालयाकडून काही अटींसह जामीन मिळाला होता. त्यानंतर  उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

याप्रकरणी गंभीर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाने जखमींची बाजू कशी पाहिली, याची आम्हाला चिंता आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आणि 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना आशिष मिश्रा याचा जामीन फेटाळला आणि त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.

लखीमपुरात काय झालं होतं?

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaAjit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवारLoksabha Election 2024 : राज्यातील चौथ्या टप्प्यातले 11 मतदारसंघ कोणते ? कसं असेल वेळापत्रक ?Ajit Pawar - Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार; विजयासाठी देवापुढे साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय',  शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं
दिल्लीची गुजरात मोहीम फत्ते, रिषभ पंतची टीम विजयाच्या ट्रॅकवर, मॅच संपताचं सगळं सांगून टाकलं..
Embed widget