Kedarnath : आजपासून केदारनाथ मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी
Kedarnath Dham : आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. केदारनाथ धाम 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष मानलं जातं.
Kedarnath Dham : आजपासून केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर खुले करण्यात आले आहेत. पहाटे 6 वाजून 25 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारात मंदिराचं दरवाजे उघडण्यात आले. यावेळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थि होते. मंदिर उघडण्याच्या वेळी 10 हजार भाविकही उपस्थित होतो. सहा महिन्यनंतर उघडलेल्या केदारनाथ मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी सुमारे 10 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलं. आज मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळतेय. केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो.
भाविकांना गौरीकुंड येथून केदारनाथला जाण्याची परवानगी
गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे 21 किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने कापले. गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी 4 वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.
#WATCH | The doors of Kedarnath Dham opened for devotees. Kedarnath's Rawal Bhimashankar Linga opened the doors of Baba Kedar. On the occasion of the opening of the doors thousands of devotees were present in the Dham. pic.twitter.com/NWS4jtGstb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2022
अक्षय्य तृतीयेपासून चार धाम यात्रेला सुरुवात
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) सुरूवात झाली आहे. चार धाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान तिसरे आहे. गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्री (Yamunotri) मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुलं करण्यात आलं आहे. बद्रीनाथ मंदिर 8 मे रोजी खुलं करण्यात येईल.
चार धाम यात्रेसाठी कोरोनाचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता नसणार आहे. उत्तरकाशीमधील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खुले करण्यात आल्यानंतर यावर्षीच्या चार धाम यात्रेला सुरुवात झालीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mahashivratri 2022 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
- Mahashivratri 2022 : भारतातील 12 ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
- Mahashivratri 2022 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवमंदिरांविषयी थोडक्यात माहिती...