JEE 2022 Dates : जेईई मेन 2022 परीक्षा पुढे ढकलली, 'असं' आहे नवं वेळापत्रक
JEE-Mains rescheduled : (JEE) मेन 2022 च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जेईई मेन 2022 सेशन 1 च्या परीक्षा - 20 ते 29 जून तर सेशन 2 च्या परीक्षा 21 ते 30 जुलै दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
JEE Mains 2022 : जॉइन्ट एंट्रन्स एग्जामिनेशन (JEE) मेन 2022 च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जेईई मेन 2022 सेशन 1 च्या परीक्षा - 20 ते 29 जून परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर जेईई मेन 2022 सेशन 2 च्या परीक्षा 21 ते 30 जुलै दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. एनटीएनं हे आधीच सांगितलं आहे की, या वर्षी जेईई मेन्स ही चार ऐवजी दोन वेळा होणार आहे.
जेईई मेन 2022 सेशन 1 च्या परीक्षा 20, 21 ,22, 23, 24, 25 ,26, 27, 28 आणि 29 जून दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर जेईई मेन 2022 सेशन 2 च्या परीक्षा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 ,30 जुलै रोजी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी या परीक्षा एप्रिल आणि मे 2022 महिन्यात नियोजित होत्या. मात्र आता या परीक्षा जून आणि जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून देण्यात आली आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड त्यासोबतच कोणत्या शहरांमध्ये परीक्षा होणार त्याबाबत लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
JEE (Main)dates rescheduled to enable students across the country to prepare well for the exams. @dpradhanbjp @EduMinOfIndia pic.twitter.com/QYABHnd7SC
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
परीक्षेच्या अधिक माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत www.nta.ac.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेईईची परीक्षा 16 एप्रिलला घेण्यात येणार होती. त्यानंतर बदल करत 21 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली. आता पुन्हा बदल करत ही परीक्षा जून- जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत nta.ac.in या संकेतस्थळावर वेळापत्रक पाहता येणार आहे. जेईई मेन- 2022 संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार 011- 40759000/011-69227700 या क्रमांकावर किंवा jeemain@nta.ac.in पर ईमेल करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून अनेक प्रवेश परीक्षाचे आयोजन करण्यात येते. जेईई चे आयोजन देखील एनटीतर्फे करण्यात येते. जेईई परीक्षा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha