एक्स्प्लोर
Advertisement
नितीश कुमार यांच्या 'जेडीयू'चा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा
पाटणा : विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसने अजून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र विरोधी पक्षांतील महत्वाचा पक्ष जेडीयूने (जनता दल युनायटेड) एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांना रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. पाटणामध्ये आज जेडीयूच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घोषणेसोबतच नितीश कुमार यांनी बिहारमधील महायुतीतील घटक पक्ष आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
नितीश कुमार यांच्या निर्णयाने मोदींविरोधात एकवटत असलेल्या विरोधकांची हवा काढली आहे. कारण नितीश कुमार यांना मोदींच्या विरोधातील महत्वाचा आणि ताकदवान चेहरा म्हणून पाहिलं जातं. मात्र नितीश कुमार यांच्या निर्णयाने काँग्रेसच्या मोदीविरोधी मोहिमेत फूट पाडल्याची चर्चा आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस देशातील सर्व छोट्या पक्षांना एकत्र आणण्याच्या विचारात आहे. त्यामध्ये नितीश कुमार यांची महत्वाची भूमिका असेल, असं मानलं जात होतं. पण गेल्या काही दिवसांपासूनची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील जवळीक राजकीय चर्चांना बळ देत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement