एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपने 2019 ची दावेदारी मजबूत केली : आंतरराष्ट्रीय मीडिया
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या सर्व पाच राज्यात सत्ता बदलाचं चित्र निर्माण झालं आहे. पाच पैकी दोन राज्यात भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे मणिपूरमध्ये भाजपने खातं उघडलं आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळवलेल्या या विजयानंतर जगभरातील माध्यमांनी मोदींचं कौतुक केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांना आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आलं आहे.
बीबीसी :
भारतातील सत्तेचं संतुलन निर्णायकपणे भाजपच्या पारड्यात आल्याचं चित्र आहे. भारतातील राष्ट्रीय राजकारणात भाजपचं स्थान अजून बळकट झालं आहे. सोबतच भाजपला सर्व स्तरातील मतदारांना एकवटण्यात यश मिळालं. सोबतच भारतातील निवडणुकीतील जातीय समिकरणंही मोडीत निघाले, असं बीबीसीने म्हटलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्स :
पाच राज्यांच्या निकालानंतर भाजप मजबूत पक्ष झाला आहे. शिवाय 2019 च्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे. भाजपला जातीय समिकरणं मोडण्यात यश आलं. मात्र मुस्लीम मतं मिळवण्यात भाजपला फारसं यश आलं नाही, असं अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे.
हफिंगटन पोस्ट :
हफिंगटन पोस्टने ‘सॅफ्रन स्वीप’ या मथळ्यासह भारतातील निवडणुकांचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या विजयाने भारतातील सत्ता केंद्र बदलण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे, असं हफिंगटन पोस्टने म्हटलं आहे.
दी गार्डीयन :
मोदींच्या या विजयाने राष्ट्रीय प्रतिस्पर्धी राहुल गांधींच्या पात्रतेवर प्रश्न निर्माण केला आहे. ज्या राहुल गांधींचा संबंध नेहरु-गांधी कुटुंबाशी आहे आणि या कुटुंबाने 70 वर्षांपेक्षा अधिक काळ भारतावर राज्य केलं आहे, असं ब्रिटनचं वृत्तपत्र दी गार्डीयनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement