Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का?
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरु होते.
Ratan Tata Passed Away : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरु होते. अखेर आज वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रक्तदाब कमी झाल्यानं 7 ऑक्टोबरला रतन टाटा यांना पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रतन टाटा यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? ते चार वेळा प्रमात पडले मात्र, त्यांनी लग्न केले नाही. जाणून घेऊयात त्यांच्या प्रेम कथेबद्दलची माहिती.
अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होते
रतन टाटा हे चार वेळा प्रेमात पडले होते. पण त्यांनी कोणासोबतही लग्न केले आहे. आयुष्यभर ते सिंगलच राहिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या अधुऱ्या प्रेम कथेबद्दल सांगितलं होतं. जेव्हा ते अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होते. पण त्यादरम्यान त्यांच्या आजींची प्रकृती बिघडली. त्यांची आजी भारतात होती आणि त्यांना रतन टाटा यांना भेटायचे होते. त्यामुळे रतन टाटा यांना भारतात परतावे लागले. त्यावेळी रतन टाटा यांची प्रेयसी देखील भारतात येणार होती आणि त्यानंतर दोघेही लग्न करणार होते. पण त्या काळात भारत-चीन या दोन देशांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची प्रेयसी भारतात आलीच नाही. काही काळानंतर तिने अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत लग्न केले.
प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही
बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन (BMA) च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत अनेक वैयक्तिक अनुभव शेअर करताना रतन टाटा यांनी सांगितले होते की, मी आयुष्यात चार वेळा प्रेमात पडलो, पण मी अजूनही सिंगलच आहे. प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही. सिमी ग्रेवालच्या कार्यक्रमामध्ये देखील रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं, कधी कधी मला आयुष्यात एकटं वाटतं आणि वाटतं की, कोणाची तरी सोबत पाहिजे होती. पण नंतर त्यांनी सांगितले की, ते सिंगल आहेत, हे एक प्रकारे चांगले आहे. कारण त्यांना कोणाची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना कामाकडे अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येते.
उदार व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख
अतिशय उदार व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. ते आता 86 वर्षांचे आहेत. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या नेतृत्वात टाटा समुहाने व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्ण जगाला माहित आहे. देशाच्या कोणत्याही बिकट परिस्थितीत ते मदत करायला नेहमी सर्वात पुढे असायचे. एक साधे, थोर आणि उदार व्यक्तीमत्व, आदर्श आणि लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. छोट्या कर्मचाऱ्यांनाही ते आपले कुटुंब मानत होते. आपल्या कर्मचाऱ्यांची ते फार काळजी घेत होते.
महत्वाच्या बातम्या: