Ratan Tata Passed Away : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
Ratan Tata Passed Away : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं. टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधानाचे अधिकृत वृत्त दिले आहे.
सगळ्यांनीच त्यांच्यामध्ये देव पाहिला - अर्जुन देशपांडे : युवा उद्योजक
'दोन दिवसांपासून मी रतन टाटा ज्या रुग्णालयात होते, तिथेच आहोत. त्यांना लवकरात लवकरच बरं वाटावं अशा प्रार्थना आम्ही करत होतो. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यामध्ये देव पाहिला होता. माणुसकी काय असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं', अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी एबीपी माझाला दिली आहे.
कसे होते रतन टाटा?
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.
टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिली आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत
View this post on Instagram