'Pfizer आणि Moderna पेक्षा भारतीय लस चांगल्या', अदर पूनावाला यांचा दावा
Adar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणूविरूद्धची भारतीय लस फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) सारख्या परदेशी लसींपेक्षा चांगली आहे.
Adar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणूविरूद्धची भारतीय लस फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) सारख्या परदेशी लसींपेक्षा चांगली आहे. कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात पहिली स्वदेशी लस कोविशील्ड बनवणाऱ्या अदर पूनावाला यांनी बुधवारी हा दावा केला.
'एएनआय' वृत्तसंस्थेनुसार, अदर पूनावाला यांनी दावा केला आहे की, मेड इन इंडिया लसी फायझर आणि मॉडर्ना सारख्या लसींपेक्षा कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण देतात. ते म्हणाले की, फायझर आणि मॉडर्ना यांना भारतात वापरण्यास परवानगी दिली नाही, हे चांगलं झालं.
आपल्या या दाव्यावर अदर पूनावाला यांनी अमेरिकेचे उदाहरण देत म्हटले आहे की, अमेरिकेसारख्या देशात दुसरा आणि तिसरा बूस्टर डोस घेतल्यानंतरही मोठा संख्येने लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भारतीय लस लोकांना कोरोनापासून चांगले संरक्षण देत आहेत. पूनावाला यांनी कोविशील्ड लसीच्या निर्यातीबद्दल ही मुद्दा उपस्थित केला.
लसीच्या निर्यातीबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताने 80 हून अधिक देशांमध्ये लस निर्यात केली आहे. Covishield चे जवळपास 10 कोटी डोस परदेशात पाठवण्यात आले आहेत. अदर पूनावाला म्हणाले की, आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कोरोना लसीची मागणी कमी झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात सीरम इन्स्टिट्यूटनेच पहिली स्वदेशी लस बनवली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Nepal : नेपाळसह संपूर्ण दक्षिण आशियात डॉ.बाबासाहेबांचा प्रभाव; नेपाळच्या राष्ट्रपतींकडून स्मरण
- India : रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेची भारताला सूचना, मंत्री जयशंकर यांच्या उत्तराने...
- Gautam Adani news : मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, सहाव्या क्रमांकावर मिळवले स्थान
- Sri Lanka Gold Rate : सोन्याच्या लंकेत खऱ्याखुऱ्या सोन्याचा भाव चक्रावून सोडणारा, एक तोळा सोनं तब्बल..