एक्स्प्लोर
रेल्वेचे तिकीट, जेवणाची ऑर्डर सर्व सुविधा फक्त एका क्लिकवर शक्य

नवी दिल्ली: रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या मोबाईल तुमच्या अॅपमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातील सर्व सुविधा मिळणे सहज शक्य होणार आहे. रेल्वे विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ''आम्ही रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेच्या सर्व सुविधा एकत्रित करुन अॅपलिकेशन विकसीत करत आहोत. या अॅपमध्ये प्रवाशांच्या सर्व गरजांची काळजी घेतली जाईल. तसेच याच्या माध्यमातून तुम्ही तिकीट बुकिंगपासून ते टॅक्सीचे आरक्षण आणि जेवणाची ऑर्डरही देऊ शकाल.'' या अॅपवरुन इतरही अनेक कामे करणे शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, रेल्वे प्रवासानंतर कुली सर्व्हिस, आरामासाठी एखादी रुमचे बुुकिंग, रेल्वे डब्यातील स्वच्छतेच्या तक्रारी, डिजिटल एंटरटेनमेंट, रेल्वे आरक्षण वेटिंगमध्ये असतानाही विमान तिकीटाचे बुकिंग करणे, अशा विविध सुविधा या अॅपमध्ये देण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे स्विकारल्यापासून रेल्वेच्या डिजिटल क्रांतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यामुळे रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यात मदत मिळाली आहे. रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातूनही पुढाकार घेऊन आपल्या कार्यप्रणालीत अनेक बदल घडवून आणले. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये सहकार्य वाढीस लागले आहे. सुरेश प्रभूंनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातील प्रवाशांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांचे तातडीने दखल घेऊन निवारण केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















